अल्पावधीतच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेली मालिका म्हणजे भाग्य दिले तू मला. कलर्स मराठी वरील या मालिकेने कमी वेळात प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेतला. मालिकेतील राज कावेरीची जोडी प्रेक्षकांच्या चांगल्याचं पसंतीस उतरली. काही दिवसांपूर्वी मालिकेत राज कावेरीवर मोठं संकट आलं होत पण राज कावेरीने एकत्र राहून एकमेकांना साथ देत त्या संकटावर मात केल्याचं दिसत आहे.(Bhagya Dile Tu Mala Today Episode)
वैदेही आणि सानियाने मिळून रत्नमाला मोहिते यांचा मिळवलेला माहेरचा चहा आता पुन्हा एकदा रत्नमाला यांच्या कडे जाऊ शकतो कारण सानिया विरोधात वैदेहीनेच कोर्टात धाव घेतल्याचं दिसतंय. मालिकेच्या आतापर्यंतच्या भागात सानिया वैदेहीला किडनॅप करण्यासाठी गुंड पाठवते. आणि राज कावेरीला वैदेहीला त्या गुणदान पासून वाचवतात असे दिसले आहे. पुढे राज कावेरी आणि वैदेही यांच्या मध्ये पुन्हा एकदा मैत्री झालेली दिसते. राज विधीला यातून वाचवण्यासाठी सानिया विरोधातचे पुरावे मीडियाला देतो आणि वैदेहीने हे सगळं सानियाच्या सांगण्या वरून केलं हे स्पष्ठ होत.

पाहा काय घडणार आजच्या भागात(Bhagya Dile Tu Mala Today Episode)
तर मालिकेच्या आजच्या भागात पोलीस सानिया पर्यंत पोहचणार का? सानिया विरोधात विधीने साक्ष दिल्यावर माहेरचा चहा रत्नमाला मोहिते आणि राज कावेरीला त्यांची पूर्ण प्रॉपर्टी परत मिळणार का? हे पाहणं रानजक ठरणार आहे.
भाग्य दिले तू मला मालिका सध्या प्रेक्षकांच्या चांगल्याच पसंतीस उतरताना पाहायला मिळते. मालिकेत अभिनेत्री निवेदिता सराफ यांचं रत्नमाला हे पात्र आणि राज कावेरी म्हणजेच अभिनेता विवेक सांगळे आणि अभिनेत्री तन्वी मुंडले यांच्या सह सर्वच पात्र आपल्या दमदार अभिनयाने ही कथा प्रेक्षकांना पर्यंत पोहचवण्यात यशस्वी ठरत आहेत.