अनेक कलाकार त्यांच्या काही विशिष्ठ अदाकारींसाठी, स्टाईल साठी ओळखले जातात. त्यांपैकी एक अभिनेता म्हणजेच महाराष्ट्राचे लाडके अभिनेते अशोक सराफ. आज अशोक सराफ यांचा ६७ वा वाढदिवस. ज्या काळात कलाकारांच्या केसांनीच विशिष्ट स्टाईल, अभिनेत्रींच्या विविध साड्यांची होणारी चर्चा या गोष्टी प्रेक्षकांना आवडायच्या तिथे शर्टाची २ बटणं उघडी ठेवून नेहमी डॅशिंग लुक मध्ये राहण्याचा ट्रेंड सेट केला तो अशोक मामांनी. नक्की मामांकडून हा ट्रेंड सेट कसा झाला या बद्दल अशोक सराफ यांनी एका मुलाखतीमध्ये किस्सा सांगितला आहे.(Ashok Saraf Birthday Special)
अशोक सराफ म्हणले आमच्या काळात शूटिंग करत असताना आताच्या सारख्या एअर कंडिशन गाड्या किंवा महागडी AC हॉटेल्सच्या रूम्स असं फार काहीस नसायचं. त्यात शूटिंग चे लोकेशन्स बऱ्याचदा आऊटडोअर असायचे तयामुळे उकड्याने जीव त्रासून जायचा. म्हणून अशोक सराफ शर्टाची पहिली दोन बटणं नेहमी उघडी ठेवायचे त्यामुळे त्यांना काम करणं ही सोप्प व्हायचं आणि उकाडा ही कमी जाणवायचा.
त्याकाळी नुकतीच आलेली फॅशन ही मामांकडून नकळत पणे आपल्या इंडस्ट्रीत ट्रेंड व्हायला लागली. अशोक सराफ, लक्ष्मीकांत बेर्डे, सचिन पिळगावकर, महेश कोठारे यांसारखी तगडी मंडळी त्याकाळी आपल्या अभिनयाने मराठी चित्रपटसृष्टी बहारदार बनवली होती तेव्हापासून अभिनयाचीही एक वेगळा ट्रेंड अशोक मामा आणि त्यांच्या या साथीदारानी सेट केला आहे.(Ashok Saraf Birthday Special)
हे देखील वाचा – ‘चाहत्यांच्या गर्दीत रमले मामा,पण पाकीट गेलं चोरीला’तरी पाकीट चोरणाऱ्याची अशी झाली होती फजिती……
अभिनयाचं वारं ज्याच्या अंगी भिनल त्या कलाकाराची मजबूत बाजू ही अभिनय आणि कमकुवत बाजू ही अभिनयचं असतो. कलेला अग्रस्थानी ठेऊन कलेशी नाळ जोडून राहिलेले मराठी इंडस्ट्रीतील महानायक अभिनेते अशोक सराफ. पांडू हवालदार ते अगदी हल्लीच ‘वेड’ मधील छोट्या झलकेने वर्षे गेली तरी विनोदाची वेळ अजून तिचं अगदी जिथं हवी तिथे याची जाणीव मामांच्या अभिनयातून होते.
संपूर्ण मनोरंजन विश्व अशोक सराफ याना मामा म्हणून ओळखत. आजही ठराविक घटकांना विचारलं की तुमच्या आवडत्या कलाकारांच्या यादीतील एखादं नाव सांगा तर हक्काने अशोक मामा असं सांगितलं जात.(Ashok Saraf Birthday Special)