‘बाहुबली’ फेम अभिनेता प्रभास याचा बहुचर्चित व तितकाच वादग्रस्त ठरलेला ‘आदिपुरुष’ चित्रपट या वर्षी १६ जूनला प्रदर्शित झाला होता. मात्र, चित्रपटाच्या प्रदर्शनानंतर त्यातील संवाद, कलाकारांचे वेशभूषा व व्हीएफक्सवरून बराच वाद निर्माण झाला होता. शिवाय अनेकांनी चित्रपटावर जोरदार टीका केली होती. एकूणच, या सगळ्या वादाचा परिणाम चित्रपटाच्या कमाईवर दिसून आला होता. (Adipurush OTT Release)
यांमुळेच ‘आदिपुरुष’ चित्रपट बॉक्स ऑफिसवर अपयशी ठरला असला, तरी प्रभासचे चाहते या चित्रपटाच्या ओटीटी प्रदर्शनाची वाट पाहत होते. अखेर ‘आदिपुरुष’ चित्रपट आज दोन ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित करण्यात आला आहे.
सुरुवातीला चित्रपटामुळे निर्माण झालेला वाद पाहता कोणताही ओटीटी प्लॅटफॉर्म ‘आदिपुरुष’ चित्रपट घेण्यास तयार नसल्याचे वृत्त समोर आले होते. मात्र आता हा चित्रपट आज ओटीटीवर प्रदर्शित करण्यात आला असून ‘अमेझॉन प्राईम’ व ‘नेटफ्लिक्स’ या दोन ओटीटी प्लॅटफॉर्मवर हा चित्रपट प्रेक्षकांना पाहता येणार आहे.
हे देखील वाचा – कोट्यवधी रुपयांच्या दोन कार वाहून गेल्या, सामानाचंही नुकसान अन्…; सनी लिओनीने सांगितला ‘तो’ प्रसंग, म्हणाली, “रडले आणि…”
चित्रपटाचं हिंदी व्हर्जन आज ‘नेटफ्लिक्स’वर प्रदर्शित केला आहे. तर तेलगू, तमिळ, कन्नड व मल्याळम व्हर्जन ‘अमेझॉन प्राईम’वर प्रदर्शित करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, चित्रपट मोठ्या पडद्यावर प्रदर्शित झाल्यानंतर जेव्हा ते ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होते, तेव्हा त्याची जोरदार चर्चा होते. मात्र, ‘आदिपुरुष’ वादाच्या भोवऱ्यात अडकल्याने या ओटीटी प्लॅटफॉर्म्सने कोणताही गाजावाजा न करता हा चित्रपट प्रदर्शित केला आहे.
हे देखील वाचा – वत्सल-इशिताच्या मुलाचं नाव ठरलं, बारशाचा व्हिडीओही केला शेअर, मुलाच्या नावाचं सोनम कपूरच्या लेकाशी कनेक्शन
महाकाव्य रामायणावर आधारित ‘आदिपुरुष’ चित्रपटात प्रभासने रामाची भूमिका केली होती. तर अभिनेत्री क्रिती सेनन, सनी सिंग, सैफ अली खान, देवदत्त नागे व अन्य कलाकारांनी महत्वाची भूमिका साकारली होती. चित्रपटाचे लेखन मनोज मुंतशीर, तर दिग्दर्शन ओम राऊत यांनी केले होते. (Adipurush OTT Release)