Ankush New Marathi Movie Cast : मराठी मनोरंजन विश्वात अनेक चित्रपट प्रेक्षकांचं मनोरंजन करत असतात. प्रेक्षकांना नेहमीच नवीन कथा, नवीन कलाकार त्यांचा अभिनय पाहण्याची उत्सुकता असते. अशातच प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी सज्ज झालाय नवाकोरा, धमाकेदार ऍक्शन असणारा चित्रपट ‘अंकुश’. नाव आणि कथेतील नाविन्याप्रमाणेच चित्रपटातून अभिनयाचा नवाकोरा चेहरा देखील प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘अंकुश’ या चित्रपटातून अभिनेता दीपराज घुले रुपरी पडद्यावर पदार्पण करून प्रेक्षकांना त्याच्या अभिनयाची भुरळ पाडणार आहे. निर्माते भाऊराव घुले या चित्रपटाचे निर्माते असून दिग्दर्शक निशांत ढापसे या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत.
अशी असणार ‘अंकुश’ या दमदार चित्रपटाची तगडी स्टार कास्ट
दीपराज या चित्रपटात मुख्य नायक ‘अंकुश सुर्वे’ ही भूमिका साकारणार आहे.
‘अंकुश’ चित्रपटात मुख्य भूमिका दीपराज साकारत असून दीपराज सोबत मराठमोळी अभिनेत्री केतकी माटेगावकर या चित्रपटात मुख्य नायिकेची भूमिका साकारणार आहे.
अंकुश या ऍक्शनपट चित्रपटात मराठी, हिंदी, आणि साऊथ चित्रपटात आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकणारे अभिनेते सयाजी शिंदे चित्रपटात मास्टर माईंड राणा परदेशी या भूमिकेत दिसणार आहेत.
तसेच चित्रपटात मराठी मनोरंजनसृष्टीतील आणखी एक दमदार अभिनेता झळकणार असून चित्रपटातील ‘भोसले’ ही महत्वपूर्ण भूमिका अभिनेता चिन्मय उदगीर साकारणार आहे.
आपल्या हटके विनोदशैली ने संपूर्ण महाराष्ट्राला खदखदून हसवणारा अभिनेता गौरव मोरे या चित्रपटात ‘मंग्या भाई’ ही हटके भूमिका पार पाडणार आहे.
मराठी चित्रपटसृष्टीतील निर्माते, अभिनेते मंगेश देसाई या चित्रपटात ‘साजन भाई’ या व्यक्तिरेखेत दिसणार आहेत.
केतकी माटेगावकरसह मनोरंजनसृष्टीतील मनमोहक अंदाजात आपला अभिनय सादर करणारी अभिनेत्री ऋतुजा बागवे या चित्रपटात एका करारी भूमिकेत प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.
अभिनेते नागेश भोसले या चित्रपटात एका पाहुण्या कलाकाराची पण लक्षवेधी भूमिकेत प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत.
चित्रपटातील नायक अंकुशला आडकाठी आणणारा इन्स्पेक्टर ही भूमिका अभिनेते भारत गणेशपुरे साकारणार आहेत.
दीपराज या चित्रपटात मुख्य नायक ‘अंकुश सुर्वे’ ही भूमिका साकारत असून त्याच्या सोबत. त्याच्या आई वडिलांची भूमिका अभिनेत्री पूजा नायक आणि अभिनेते शशांक शेंडे साकारणार आहे.
वडिलांची भूमिका अभिनेते शशांक शेंडे साकारणार आहे.
मराठीतील अशा तगड्या कलाकारांच्या उत्कृष्ट अभिनयाने ‘अंकुश’ चित्रपट मोडणार यशाचे अनेक रेकॉर्डस्.