शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

सुशांत सिंह राजपूतच्या घरी भाड्याने राहते अदा शर्मा, मात्र तिथे जाणवते भीती?, म्हणाली, “भीतीपोटी प्रश्न…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
ऑक्टोबर 15, 2024 | 7:00 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Adah Sharma

सुशांत सिंह राजपूतच्या घरी भाड्याने राहते अदा शर्मा

Adah Sharma :  ‘द केरळ स्टोरी’ अभिनेत्री अदा शर्मा काही महिन्यांपूर्वी दिवंगत सुशांत सिंग राजपूतच्या मुंबईतील घरी शिफ्ट झाली होती. काही वर्षांपूर्वी याच घरात सुशांत सिंगचा मृत्यू झाला होता. सुशांतचे घर चार वर्षे रिकामे राहिले आणि यावर्षी अदा शर्मा येथे शिफ्ट झाली. दिवंगत अभिनेत्याच्या घरी शिफ्ट झाल्यामुळे अभिनेत्रीलाही ट्रोल व्हावे लागले होते. आता अदाने एका मुलाखतीत याबद्दल केलेलं भाष्य चर्चेत आलं आहे. दिवंगत सुशांत सिंह राजपूतच्या घरी शिफ्ट झाल्यामुळे अदा शर्माला टीकेला सामोरे जावे लागले होते. खरं तर, नेटकऱ्यांनी तिच्यावर प्रसिद्धीसाठी सुशांतच्या नावाचा वापर केल्याचा आरोप केला होता.

आता अदाने ‘इंडिया टुडे’ला दिलेल्या मुलाखतीत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. अदा म्हणाली, “एक अभिनेता म्हणून किंवा एक व्यक्ती म्हणून तुम्ही सांगितलेल्या प्रत्येक गोष्टीवर प्रतिक्रिया देऊ शकत नाही. आपल्या सर्वांना आयुष्यात खूप काही करायचे आहे. तसेच, हा एक स्वतंत्र देश आहे आणि प्रत्येकाला त्यांचे मत मांडण्याचा अधिकार आहे, जर एखादी गोष्ट करावीशी वाटत असेल तर प्रत्येकाने ती केली पाहिजे आणि ती करत राहिली पाहिजे”. अदा पुढे म्हणाली, “मी एक चांगली व्यक्ती आहे हे कोणालाही सांगण्यासाठी किंवा माझ्या कृतीची कारणे सांगण्यासाठी मी येथे नाही. मला जे करायचे होते ते मी केले, आणि मी स्वतःला ओळखते. मी स्वतःला बदलणार नाही, मी खरोखरच स्थायिक झाले आहे आणि मला हे ठिकाण आवडते”.

आणखी वाचा – Atul Parchure Death : ४० वर्षांची मैत्री संपली! अतुल परचुरेंना शेवटचं पाहताना सुकन्या व संजय मोनेंना रडू अनावर, स्टेजवरील ‘तो’ शेवटचा व्हिडीओ व्हायरल

View this post on Instagram

A post shared by Adah Sharma (@adah_ki_adah)

अदा शर्मा जूनपासून मुंबईतील वांद्रे येथील मोंट ब्लँक या समुद्राभिमुख इमारतीत सुशांत सिंग राजपूतच्या घरात भाड्याने राहत आहे. फिल्मीज्ञानला दिलेल्या मुलाखतीत तिला विचारण्यात आले की, सुशांतच्या घरात तिला भीती वाटते का? तिला कधी सुशांतची उपस्थिती जाणवली का? या घरात तिला कधी भीतीदायक गोष्टींचा भास झाला आहे का? या प्रश्नांची उत्तरे देताना अभिनेत्री म्हणाली, “मला हे समजले आहे की, लोक मला बहुतेक त्यांच्या भीतीपोटी प्रश्न विचारतात. भीतीपोटी असे प्रश्न विचारणे योग्य नाही असे मला वाटते”.

आणखी वाचा – Atul Parchure Death : “आमचा प्रोजेक्ट अपूर्णच राहिला आणि…”, अतुल परचुरेंबाबत बोलताना महेश मांजरेकर भावुक, म्हणाले, “अचानक असं झालं…”

अदा पुढे म्हणाली, “सुशांत सिंग राजपूतला त्याच्या चमकदार कामासाठी आणि कामगिरीसाठी लक्षात ठेवले पाहिजे. तो एक अतिशय प्रतिभावान अभिनेता होता”. अदाच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर अदा नुकतीच ‘बस्तर: द नक्सल स्टोरी’ मध्ये दिसली होती. सुदीप्तो सेन दिग्दर्शित आणि विपुल अमृतलाल शाह निर्मित, हा चित्रपट १५ मार्च रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. ही अभिनेत्री लवकरच ‘रीता सन्याल’ या नाटक मालिकेत दिसणार आहे. यामध्ये ती वकिलाच्या भूमिकेत दिसणार आहे.

Tags: adah sharmaadah sharma buys sushant singh rajput homeadah sharma sushant singh rajput
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Aamir khan talk about his girlfriend
Entertainment

“प्रेम लपवणं म्हणजे तिचा अपमान”, ६०व्या वर्षी तिसऱ्यांदा प्रेम, गर्लफ्रेंडबाबत बोलला आमिर खान, नातं जगजाहिर केलं कारण…

जून 6, 2025 | 7:00 pm
Anushka Sharma And Virat Kohli
Entertainment

IPLमध्ये विराट कोहलीचा विजय पण अनुष्का शर्मा झाली श्रीमंत, तब्बल इतकी आहे संपत्ती, एकूण कमाई…

जून 6, 2025 | 6:00 pm
muzammil Ibrahim on pooja bhatt
Entertainment

“कलाकार कुत्र्यांसारखे असतात, शिवीगाळी करुन…”, पूजा भट्टवर सुप्रसिद्ध अभिनेत्याचे गंभीर आरोप, घाणेरडी वागणूक दिली अन्…

जून 6, 2025 | 5:00 pm
Who Is Hina Khan Husband
Entertainment

हिना खानचा नवरा नक्की कोण आहे आणि काय करतो?, अभिनेत्रीला कॅन्सर झाला तेव्हा घेत होता काळजी, कमाई आहे तब्बल…

जून 6, 2025 | 4:00 pm
Next Post
16 october 2024 Wednesday daily horoscope auspicious day for Aries, Pisces and Virgo people

16 October Horoscope : मेष, मीन व कन्या राशींच्या लोकांसाठी बुधवारचा दिवस शुभ, इतरांच्या नशिबात काय?, जाणून घ्या..

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.