राज्यभरात सर्वत्र दिवाळीचा वेगळा उत्साह पाहायला मिळत आहे. यानिमित्त ठिकठिकाणी विद्युत रोषणाई पाहायला मिळते. तसेच सर्वसामान्यांप्रमाणे कलाकार मंडळीही दिवाळीनिमित्त घर व कारची खरेदी करताना दिसत आहे. मराठी मनोरंजन सृष्टीतील लोकप्रिय जोडी सिद्धार्थ चांदेकर व मिताली मयेकर हे नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतात. कधी त्यांच्या रील्समुळे, तर कधी त्यांच्या फोटोशूटमुळे. जरी यावरून अनेकदा चर्चा रंगात असल्या, तरी दोघांचे बॉण्डिंग त्यांच्या चाहत्यांना प्रचंड आवडते. आता ही क्युट जोडी एका वेगळ्या कारणांसाठी चर्चेत आली आहे. (Mitali Mayekar answers to netizens on her new car)
अभिनेता सिद्धार्थ चांदेकर व मिताली मयेकर यांनी मिळून त्यांची नवी कोरी आलिशान कार खरेदी केल्याची बातमी त्यांच्या चाहत्यांसह शेअर केली. यावेळी मितालीने या कारबरोबरचा एक व्हिडीओ शेअर केला. ज्याला तिने “माझी लक्ष्मी आली” असं कॅप्शन दिलं होतं. यावेळी दोघांनी पारंपरिक लूक परिधान करत सर्वांचे लक्ष वेधले होते. तिच्या या व्हिडिओला कलाकारांसह चाहत्यांनी दोघांचं अभिनंदन केलं आहे.
हे देखील वाचा – Video : एकमेकांना केक भरवला, सेलिब्रेशन अन्…; आदेश व सुचित्रा बांदेकरांच्या लग्नाला ३३ वर्ष पूर्ण, लेक सोहम म्हणाला, “तुमचा त्याग, कष्ट…”
दरम्यान, अभिनेत्रीच्या या पोस्टला काही नेटकऱ्यांनी कमेंट करत आपले लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न केला. एक नेटकरी मितालीच्या पोस्टवर “मर्सिडीज घ्यायची ना.”, अशी कमेंट केली असता मिताली त्याला उत्तर देताना म्हणाली, “माझा तेवढा बजेट नव्हता. पण पुढच्या वर्षी नक्की घेईन.”. मितालीच्या या उत्तराची सध्या बरीच चर्चा होताना दिसत आहे.
हे देखील वाचा – सई ताम्हणकरने नव्या आलिशान घरातच आयोजित केला दिवाळी कार्यक्रम, मराठी कलाकारांची गर्दी अन्…; व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

अभिनेता सिद्धार्थ चांदेकर सध्या त्याच्या ‘झिम्मा २’ चित्रपटामुळे चर्चेत आला, जो येत्या २४ नोव्हेंबरला संपूर्ण महाराष्ट्रभरात प्रदर्शित होणार आहे. मात्र मिताली मनोरंजन सृष्टीत फारशी सक्रिय नसली, तरी तिच्या बोल्ड फोटोशूटची बरीच चर्चा होते. काही महिन्यांपूर्वी दोघांनी मुंबईत स्वतःचं घर घेतलं. त्यानंतर आता दिवाळीच्या मुहूर्तावर नवी कोरी आलिशान कार खरेदी केली, ज्यावर अनेकांनी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला.