Vishakha Subhedar Son Reaction : नाटक, मालिका, चित्रपट व रिॲलिटी शोज यासारख्या अनेक माध्यमांतून घराघरांत लोकप्रिय असलेल्या सर्वांच्या लाडक्या अभिनेत्री म्हणजे विशाखा सुभेदार. ‘फु बाई फू’, ‘कॉमेडीची बुलेट ट्रेन’, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ यांसारख्या अनेक विनोदी कार्यक्रमांतून विशाखा यांनी त्यांच्या विनोदी अभिनयाची छाप सोडली आहे. विशाखा यांनी पोट धरुन हसवणाऱ्या विनोदी भूमिकेसह खलनायिकेच्या भूमिकेत प्रेक्षकांची मन जिंकली. सध्या विशाखा ‘शुभविवाह’ या मालिकेत महत्त्वपूर्ण भूमिकेत पाहायला मिळतेय. अभिनेत्रीच्या या मालिकेतील भूमिकेचं विशेष कौतुक होताना पाहायला मिळत आहे.
अशातच मालिकेतील एका सीन दरम्यानच्या अभिनेत्रीच्या अभिनयाचं तिच्या लेकाने कौतुक केलं आहे. “कडक आई कडक, रिअक्शन आवडली, ऑन पॉईंट हवं तेवढं, परफेक्ट, शाब्बास”, अशा शब्दात विशाखाच्या लेकाने आईच्या अभिनयाचं कौतुक केलं. विशाखाने याचा एक स्क्रीनशॉट शेअर करत लेकीसाठी खास पोस्ट लिहिली आहे. जेव्हा मुलगा आईचं कौतुक करतो, असं म्हणत तिने त्याच तोंडभरुन कौतुक केलं आहे.
विशाखाने पोस्ट शेअर करत असं म्हटलं आहे की, “जेव्हा मुलगा आईचं कौतुक करतो. अभिनय लहानपणापासूनच समीक्षकाची भूमिका वठवत आला आहे. काय चांगल, काय वाईट हे नेहमीच त्यांनी मला बेधडक सांगितलं. त्याला मी पाठ झालीय आणि रागिणी तर त्याने जवळजवळ दीडवर्षे जवळून पाहिलीय. दिग्दर्शन टीममध्ये राहून वेगळं काहीतरी शोधणं, हे दोघांनाही आवडतं ते वेगळेपण मिळालं की त्याच्याकडून ही शाबासकी मिळते. त्यामुळेच तर त्याची ही प्रतिक्रिया माझ्यासाठी खास आहे. थँक यु अभिनय”.
आणखी वाचा – हिरवा चुडा, फुलांचे दागिने अन्…; रेश्मा शिंदेच्या दाक्षिणात्य लूकला मराठमोळा टच, हळदी स्पेशल फोटो समोर
विशाखा सुभेदारच्या लेकानेही आई- वडिलांपाठोपाठ सिनेविश्वात काम करण्याचा निर्णय घेतला आहे. अभिनेत्री विशाखा सुभेदार यांचा मुलगा अभिनय याने देखील दिग्दर्शन क्षेत्रात काम करण्याचा निर्णय घेतला आहे. आता अभिनय या दिग्दर्शन क्षेत्रातील अभ्यासासाठी परदेशात शिकण्यास गेला असल्याचं समोर आलं आहे. लंडन येथे शिक्षणासाठी अभिनय गेला आहे. विशाखा नेहमीच त्याच्या लेकाला मिस करतानाच्या अनेक पोस्ट सोशल मीडियाद्वारे पोस्ट करताना दिसते.