Tharla Tar Mag Serial Update : ‘ठरलं तर मग’ मालिकेच्या आजच्या भागात असं पाहायला मिळणार आहे की, प्रतिमा आगीला पाहून घाबरलेली असते. तेव्हा रविराज तिला घरी घेऊन येतो रविराजला असं वाटतं की, गर्दीत कदाचित प्रतिमाचा जीव घुसमटला असेल आणि ती घाबरली असेल. त्यामुळे ती अशी बिथरली आहे. रविराज तिला सांभाळण्याचा, सावरण्याचा प्रयत्न करताना दिसतोय. तर इकडे सायली अर्जुन समोर आपलं प्रेम कसं व्यक्त करायचं यासाठी प्रयत्न करत असते. शेवटी सायली मधु भाऊंची भेट घेते आणि मधु भाऊंना याबाबत स्पष्टपणे विचारते, तेव्हा मधु भाऊ सायलीची ही हालचाल पाहून खूपच खुश होतात.
सायली अर्जुन बरोबर खुश आहे हे पाहून ते खूपच समाधानी होतात. मधु भाऊंचं देखील वत्सला बरोबर लव्ह मॅरेज झालेलं असतं. त्यामुळे त्यांच्याकडूनच काही टिप्स मिळतात का म्हणून सायली त्यांच्या जवळ जाते. त्यावेळेला मधु भाऊ त्यांची लव स्टोरी सांगत असतात. सुरुवातीला आम्ही दोघेही एकमेकांसमोर प्रेम व्यक्त करायला घाबरत होतो, शेवटी वसलासाठी एक स्थळ चालून आलो आणि त्यावेळेला आम्ही दोघेही घाबरुन गेलो. शेवटी वत्सलानेच पुढाकार घेतला. ती एक टेप रेकॉर्ड घेऊन माझ्या घरी आली आणि मला ‘घायाळ मी हरणी’ हे गाणं ऐकवलं आणि प्रपोज केलं.
हे ऐकल्यावर सायली सुद्धा खूप खुश होते. तर वत्सलाबद्दल सांगताना मधु भाऊ ही खूप आनंदी असतात. हे ऐकल्यावर रोमँटिक गाणे अर्जुन ची मन जिंकू शकतात, असं सायलीला वाटतं. शेवटी सायली तिच्या रूममध्ये जाते आणि सांगते की, आज मी तुम्हाला काही गाणी ऐकवते तुम्ही त्याचा मला अर्थ सांगा असं म्हणत अर्जुनला गाणं ऐकायला बसवते. अर्जुनसमोर ती तीन रोमँटिक गाणी बोलते. मात्र, अर्जुन त्याचा विचित्रच अर्थ सांगतो. कारण अर्जुन हा मुळात मराठी माध्यमातील मुलगा नसून इंग्रजी माध्यमातील असतो आणि शिवाय तो युएस वरुन परतलेला असतो. त्यामुळे त्याला मराठी भाषेचं तितकसं ज्ञान नसतं. शाब्दिक उच्चार समजून तो विचित्र अर्थ तयार करतो आणि हे पाहून सायलीचा हिरमोड होतो. सायली त्याच्यावर प्रचंड नाराज होते आणि झोपून जाते. मालिकेच्या उद्याच्या भागात असं पाहायला मिळणार आहे की, सायली चैतन्यची मदत घेऊन अर्जुनला आवडेल असं काही करण्याचा प्रयत्न करते. तेव्हा चैतन्य सांगतो की, अर्जुनला हिरवा रंग फार आवडतो.
आणखी वाचा – रेश्मा शिंदेच्या हळदी समारंभातील फोटोंमध्ये दिसली नवऱ्याची झलक, नावही आले समोर, फोटो व्हायरल
तर सायली आता हिरव्या रंगाची घालून साडी नेसून अर्जुन समोर जाणार आहे आणि ते पाहून अर्जुनचा चेहरा खुलला तर समजायचं त्याच्या मनात तिच्याविषयी भावना आहेत. एकीकडे रविराज प्रतिमाला सांभाळत असतो तेव्हा प्रतिमा तिला कसं मारलं याचं विश्लेषण करताना दिसते. तेव्हा प्रियाला समजतं की प्रतिमाने तिच्या मारेकरीला म्हणजेच महिपतला ओळखलं आहे. त्यामुळे आता काही करुन प्रतिमाचा खेळ संपवावाच लागेल. तितक्यात तिथं सुमन येते आणि ती ओरडते.