मराठी मनोरंजन विश्वातील रेश्मा शिंदे, किरण गायकवाड-वैष्णवी कल्याणकर, शाल्व किंजवडेकर आणि अभिनेत्री हेमल इंगळे या कलाकारांनी अलीकडेच आपल्या जोडीदराबरोबर लग्नगाठ बांधली. अशातच लवकरच अभिनेत्री शिवानी सोनार व अभिनेता अंबर गणपुले हे सेलिब्रिटी जोडीही या यादीत सामील होईल. यावर्षी एप्रिल महिन्यात त्यांनी साखरपुडा करुन सर्वांनाच सुखद धक्का दिला होता. ९ एप्रिलला अंबर गणपुळेशी साखरपुडा झाला होता. कुठलाही गाजावाजा न करताना शिवानी व अंबरने गुपचूप साखरपुडा केला होता. त्यानंतर त्यांनी अनेकदा रोमँटिक फोटो शेअर केलेत, शिवाय गेल्या महिन्यात त्यांच्या बॅचेलर पार्टीचेही फोटो समोर आलेले आणि आता दोघांच्या केळवणालाही सुरुवात झाली आहे. (shivani sonar and ambar ganpule kelvan)
‘राजा रानीची गं जोडी’, ‘सिंधूताई माझी माई’ आणि अलीकडेच आलेली ‘तू भेटशी नव्याने’ या मालिकेतून शिवानीने प्रेक्षकांचे मनोरंजन केले. तर ‘रंग माझा वेगळा’, ‘लोकमान्य’, ‘दुर्गा’ या मालिकांमधून अंबर प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. आता ही जोडी लग्नबंधनात अडकणार असून त्यांच्या लग्नापूर्वी होणाऱ्या केळवणाला सुरुवात झाली आहे. शिवानीची मैत्रीण व अभिनेत्री विदिशा म्हसकरने या दोघांच्या केळवणाचा खास फोटो पोस्ट केला आहे. विदिशाने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर या दोघांचा फोटो पोस्ट केला आहे. या फोटोमध्ये केळीच्या पानावर शिवानी व अंबर यांचे केळवण असं लिहिलेलं पाहायला मिळत आहे.

आणखी वाचा – ‘दहावी-अ’च्या पहिल्या एपिसोडला काही तासांमध्येच लाखो व्ह्यूज, प्रेक्षकांचा भरभरुन प्रतिसाद
तर विदिशाने शेअर केलेल्या या खास फोटोमध्ये शिवानीने सोनेरी रंगाची साडी परिधान केली आहे. तर अंबरने काळ्या रंगाचा शर्ट परिधान केल्याचे पाहायला मिळत आहे. या फोटोमध्ये दोघे एकमेकांकडे बघन स्मितहास्य करत असल्याचेही दिसत आहे. तर या केळवणासाठी मांसाहारी जेवणाचा बेत असल्याचे दिसत आहे. दोघांच्या ताटातील अन्नपदार्थांवरुन विदिशाने शिवानी-अंबर यांच्यासाठी खास मांसाहारी केळवणाचा थाट केल्याचे पाहायला मिळत आहे. या फोटोसह अभिनेत्री विदिशाने दोघांना शुभेच्छाही दिल्या आहेत.
आणखी वाचा – जुई गडकरीच्या ‘त्या’ फोटोचा गैरवापर, अभिनेत्रीचा संताप, म्हणाली, “असे दुसऱ्याचे फोटो…”
दरम्यान, शिवानी व अंबरच्या साखरपुड्याचे फोटो अजूनही चर्चेत आहेत. अशातच काही दिवसांपूर्वी त्यांनी Bride To Be Party आणि Groom To Be Partyचे फोटो शेअर केले होते. त्यानंतर शिवानीच्या घरच्यांनीही केळवणाचा थाट केला होतं आणि आता विदिशानेही दोघांचे केळवण साजरे केले आहे. त्यामुळे आता शिवानी-अंबर लग्नबंधनात कधी अडकणार? याकडे त्यांच्या चाहत्यांचे लक्ष लागून राहिले आहे.