येत्या दोन महिन्यात ऑस्कर पुरस्कार २०२५ चे आयोजन केले जाणार आहे. मनोरंजन सृष्टीतील अनेकजण या पुरस्कार सोहळ्याची आतुरतेने वाट पाहत असतात. जगभरातील प्रतिष्ठित मानल्या जाणाऱ्या या सोहळ्यासाठी अनेक भारतीय चित्रपटांनादेखील नामांकन मिळाले आहे. गेल्या वर्षी ‘लापता लेडीज’ चे नाव ऑस्कर पुरस्काराच्या नॉमिनेशनसाठी समोर आले होते. मात्र हा चित्रपट ऑस्करच्या शर्यतीतून बाहेर पडला आहे. अशातच आता या या वर्षी काही चित्रपटांची नावं समोर आली आहेत. ज्यामध्ये हिंदी तसेच दाक्षिणात्य चित्रपटांचा सहभाग असलेला दिसून येत आहे. आता ९७ व्या ऑस्कर सोहळ्यासाठी दाक्षिणात्य सुपरस्टारचा एक बहूचर्चित चित्रपटाचे नाव येऊ शकते अशी चर्चा सुरु आहे. (kanguva for oscar 2025)
या वर्षी ऑस्कर पुरस्कार २०२५ मध्ये ऑस्कर पुरस्कार सोहळा पार पडणार आहे. यामध्ये अनेक भाषांमधील चित्रपटांचा समावेश होतो. यामध्ये गेल्या काही वर्षांपासून भारतीय चित्रपटांचे अढळ स्थान दिसून येत आहे. यावेळी दाक्षिणात्य सुपरस्टार सूर्याचा चित्रपट ‘कंगुवा’चे नाव समोर येत आहे. तसेच या व्यतिरिक्त अजून पाच चित्रपटांचाही समावेश दिसून येत आहे. यंदा ऑस्कर पुरस्कार सोहळ्याचे ९७ वे वर्ष आहे. २ मार्च २०२५ रोजी लॉस एंजलिस मध्ये आयोजित केला आहे.
BREAKING: Kanguva ENTERS oscars 2025🏆 pic.twitter.com/VoclfVtLBL
— Manobala Vijayabalan (@ManobalaV) January 7, 2025
दाक्षिणात्य चित्रपटाच्या ट्रेड अनालिस्ट मनोबाला विजयबालन यांनी त्यांच्या अधिकृत एक्स अकाऊंटवर ‘कंगुवा’च्या ऑस्कर एंट्रीबद्दल माहिती दिली आहे. त्यांनी ट्विटमध्ये अकादमी पुरस्काराची एक सूची जारी केली आहे. यामध्ये ‘कंगुवा’चा देखील समावेश आहे. सर्वोकृष्ट फीचर फिल्म कॅटेगरीमध्ये ‘कंगुवा’चा समावेश आहे.
त्यामुळे आता सूर्याचा हा चित्रपट ऑस्कर २०२५ मध्ये तग धरुन राहणार का? याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. याआधी आमीर खानची निर्मिती असलेला चित्रपट ‘लापता लेडीज’चा समावेश करण्यात आला होता. मात्र तो आता या शर्यतीतून बाहेर पडला आहे. यामध्ये आता ‘कंगुवा’ बरोबरच ‘द गोट लाईफ’, ‘स्वातंत्र्य वीर सावरकर’, ‘ऑल वी इमॅजीन इज लाइट’, ‘गर्ल्स विल बी गर्ल्स’ व ‘अनुजा’ या चित्रपटांचा समावेश करण्यात आला आहे.