दिवाळी हा प्रमुख हिंदू सणांपैकी एक आहे. केवळ भारतातच नव्हे, तर संपूर्ण जगभरात हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. दिवाळीचा हा उत्साह, आनंद सर्वांसाठी एक नवचैतन्य निर्माण करून देतं. असा हा दिवाळीचा सण आता अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. त्यानिमित्ताने ठिकठिकाणी घरांच्या सजावटीपासून ते फराळ बनविण्यापर्यंत मोठी तयारी सुरु आहे. सर्व सामान्यांप्रमाणे कलाकार मंडळींनाही या सणाचे वेध लागले असून अनेक जण या सणाच्या तयारीत व्यग्र असल्याचे चित्र सध्या दिसत आहे. (Urmila Kothare talks about her Diwali Celebration)
स्टार प्रवाह वाहिनीचा ‘ढिंचॅक दिवाळी २०२३’ सोहळा नुकताच पार पडला. त्यानिमित्त अभिनेत्री उर्मिला कोठारे हिने नुकतीच रेड कार्पेटवर हजेरी लावली होती. यावेळी ‘इट्स मज्जा’शी संवाद साधताना उर्मिलाने तिच्या दिवाळीतील काही आठवणी सांगितल्या. उर्मिलाने या सोहळ्याला तिच्या सासूबाईंची साडी परिधान केली होती. त्याचबरोबर नाकातली नथ आणि त्या साडीवर केलेला सुंदर असा साजशृंगार उपस्थितांचे लक्ष वेधून घेत होता.
हे देखील वाचा – ‘फ्रेंड्स’ फेम प्रसिद्ध हॉलीवूड अभिनेते मॅथ्यू पेरी यांचे निधन, हॉट टबमध्ये मृतदेह आढळल्याने खळबळ
‘इट्स मज्जा’शी बोलताना उर्मिलाने तिच्या पेहरावाबद्दल बोलली. ती म्हणाली, “खरंतर हे संपूर्ण डिझाईन मी केलं आहे. ही नारंगी रंगाची साडी माझ्या सासूबाईंची आहे.” तर पुढे तिच्या आयुष्यातील रॉकेटबद्दल विचारले असता ती म्हणाली, “माझी मुलगी जिजा हीच माझ्या आयुष्यातील रॉकेट असून तिच्या जन्मानंतर माझ्या आयुष्यात मोठा बदल झाला आहे.”
हे देखील वाचा – “दोन ते तीन महिने खूप कष्ट करत आहेस आणि…” सूनेसाठी अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांची पोस्ट, म्हणाल्या, “सूनबाई तुला…”
दिवाळीच्या फराळाबद्दल विचारताच उर्मिला म्हणाली, “मी फारसं दिवाळीचा फराळ बनवत नाही. पण माझ्या सासरी बेक्ड दुधी हलव्याची करंजी बनवली जाते, जी मला प्रचंड आवडते. त्या केवळ दिवाळीच्या वेळेस बनवली जातात. मला या करंज्या नक्की खायला आवडतात.” त्याचबरोबर येत्या दिवाळीनंतर तिच्या आगामी नव्या प्रोजेक्टची घोषणा होणार असल्याचे ती यावेळी म्हणाली. अभिनेत्री उर्मिला कोठारे सध्या याच वाहिनीवरील ‘तुझेच मी गीत गात आहे’ या मालिकेच्या निर्मितीची धुरा सांभाळताना दिसते.