‘अॅनिमल’ चित्रपटाने सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातलेला पाहायला मिळत आहे. चित्रपट बॉक्सऑफिसवर घवघवीत यश मिळवत असला तरी चित्रपटाबाबतच्या संमिश्र प्रतिक्रिया येणंही सुरुचं आहे. रणबीरसह या सिनेमात अभिनेता बॉबी देओल, अनिल कपूर, अभिनेत्री रश्मिका मंदाना यांच्या भूमिका आहेत. तसेच या सिनेमातील आणखी एका अभिनेत्रीची सध्या प्रचंड चर्चा आहे ती म्हणजे अभिनेत्री तृप्ती डिमरी. अभिनेत्रीचे अनेक इंटिमेट सीन या सिनेमात पाहायला मिळत आहेत. हे बोल्ड सीन सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. (Trupti Dimri On Animal)
तृप्तीने या सिनेमात झोया ही भूमिका साकारली होती. तृप्तीचे रणबीरबरोबरचे इंटिमेट सीन पाहून नेटकऱ्यांनी तिला बरंच ट्रोल केलेलं पाहायला मिळालं. दरम्यान अभिनेत्रीच्या पालकांची प्रतिक्रिया काय होती, याबाबत तिने स्वतःच खुलासा केला आहे. तसेच हा सीन शूट करताना सेटवर मोजकेच लोक होते, असंही तिने सांगितलं.
‘बॉलीवूड हंगामा’शी बोलताना तृप्ती म्हणाली, “हा सीन पाहून माझ्य आई-वडिलांना आश्चर्याचा धक्का बसला. ते म्हणाले, ‘आम्ही चित्रपटांमध्ये असं कधीही पाहिलं नाही आणि तू ते केलंय.’ त्यांना मी केलेला तो सीन स्वीकारायला वेळ लागला. पण ते माझ्याशी खूप छान वागत होते. ‘तू असे सीन करायला नको होते, पण केलाय तर ठीक आहे. पालक म्हणून आम्हाला या सीनचा फरक नक्कीच पडेल’ असंही ते म्हणाले. मी त्यांना म्हणाले की, “मी काही चुकीचे करत नाही. हे माझे काम आहे आणि जोपर्यंत मी कंफर्टेबल व सुरक्षित आहे तोपर्यंत मला असे सीन करण्यात कोणतीही अडचण वाटत नाही. मी एक अभिनेत्री आहे आणि मी साकारत असलेल्या व्यक्तिरेखेशी मी १०० टक्के प्रामाणिक असले पाहिजे, त्यामुळे मी तेच केले” असंही अभिनेत्री म्हणाली.
यापूर्वी ‘ई टाइम्स’ला दिलेल्या मुलाखतीत अभिनेत्रीने इंटिमेट सीन शूट करण्याबद्दल भाष्य केलं. अभिनेत्री यावेळी म्हणाली होती की, “सेटवर फक्त चार-पाच जण होते आणि तिथे इतर कोणालाही यायची परवानगी नव्हती. दिग्दर्शक, सिनेमॅटोग्राफर, मी व रणबीर सेटवर होतो. दर पाच मिनिटांनी ते मला विचारत होते, तू ठीक आहेस ना? तुला काही हवं आहे का? सीन शूट करताना माझी खूप काळजी घेतली गेली, त्यामुळे मला अस्वस्थ वाटलं नाही,” असं तृप्ती म्हणाली.