बॉलिवूड कलाकार नेहमीच कोणत्या ना कोणत्या गोष्टीमुळे चर्चेत असतात. बरेचदा ते त्यांच्या हटके फोटोशूटमुळे नेटकऱ्यांच्या कचाट्यात अडकतात. तर काही कलाकार हे न्यूड फोटोशूटमुळेही चर्चेत येतात. अशातच एका अभिनेत्याच्या न्यूड फोटोंनी सोशल मीडियावर चांगलाच धुमाकूळ घातला आहे. या अभिनेत्याने स्वतःच इंस्टाग्राम स्टोरीवरून न्यूड फोटोशूट शेअर केलेलं पाहायला मिळत आहे. हा अभिनेता म्हणजे विद्युत जामवाल. (Vidyut Jammwal Nude Photoshoot)
विद्युतने त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केलेल्या पोस्टमध्ये त्याचे न्यूड तीन फोटो शेअर केले आहेत. विद्युतचे हे फोटो सध्या सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत. या फोटोंमधील एका फोटोमध्ये अभिनेता जंगलात नदीच्या काठावर बसलेला दिसत आहे. तर दुसऱ्या फोटोत तो नदीत आंघोळ करताना दिसत आहे. यासह शेअर केलेल्या तिसऱ्या फोटोत विद्युत जामवाल चहा बनवताना दिसत आहे. विद्युतचे हे फोटो तेथील एका स्थानिक मेंढपाळ मोहर सिंगने काढले असल्याचं त्याने या पोस्टमध्ये म्हटलं आहे.
आणखी वाचा – “तू असे सीन करायला नको होते…”, ‘अॅनिमल’मधील इंटिमेट दृश्यांवर तृप्ती डिमरीच्या आई-वडिलांची नाराजी, अभिनेत्री म्हणाली, “पालक म्हणून त्यांना…”
विद्युतने शेअर केलेल्या या पोस्टमध्ये त्याने कॅप्शन देत, “हिमालय पर्वतरांगांना माझी रिट्रीट, मागच्या १४ वर्षांपासून मी असं करतोय. दरवर्षी ७ ते १० दिवस एकटं घालवणं हा माझ्या आयुष्याचा अविभाज्य भाग बनला आहे. मी माझ्या कम्फर्ट झोनच्या बाहेर सर्वात कंफर्टेबल आहे आणि मी निसर्गाच्या नैसर्गिक फ्रिक्वेन्सीमध्ये स्वतःला सामावून घेतो” असं त्याने म्हटलं आहे.
यापुढे त्याने लिहिलं आहे की, “मी घरी परत येताना हवी असलेली उर्जा इथेच निर्माण करतो, माझ्या आयुष्यातील एक नवीन अध्याय अनुभवण्यासाठी इथेच मी तयार होतो. मी आता माझ्या पुढच्या अध्यायासाठी तयार आणि उत्सुक आहे. ‘CRAKK ‘ २३ फेब्रुवारी २०२४ रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होत आहे,” असं म्हणत त्याने त्याच्या नव्या चित्रपटाच्या तारखेचीही घोषणा केली. विद्युतच्या सदर पोस्टवर नेटकऱ्यांनी भरभरून प्रतिक्रिया द्यायला सुरुवात केली आहे.