शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Video : ‘सातव्या मुलीची…’च्या शेवटच्या दिवशी ऐश्वर्या नारकरांसह इतर कलाकार ढसाढसा रडले अन्…; सगळ्यात भावुक व्हिडीओ व्हायरल

Saurabh Moreby Saurabh More
डिसेंबर 23, 2024 | 7:00 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Actress Titeeksha Tawde shared a glimpse of the last day shooting of Satvya Mulichi Satavi Mulgi on her YouTube channel

‘असं’ पार पडलं ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’चे शेवटचे शूटिंग, अभिनेत्री तितीक्षा तावडेने दाखवली संपूर्ण झलक

पडद्यावर घडणाऱ्या घडामोडींपेक्षा पडद्यामागे घडणाऱ्या काही रंजक गोष्टी जाणून घेण्यात प्रेक्षकांना व चाहत्यांना अधिक रस असतो. मनोरंजन विश्वातील अनेक कलाकार मंडळी आपल्या चाहत्यांपर्यंत पडद्यामागच्या रंजक घटना, प्रसंगे किंवा काही किस्से शेअर करत असतात. अशा काही कलाकारांपैकी एक कलाकार म्हणजे अभिनेत्री तितीक्षा तावडे. तितीक्षा ही सोशल मीडियावर कायम सक्रीय असणाऱ्या कलाकारांपैकी एक आहे. सोशल मीडियाबरोबरच तितीक्षाचे स्वत:चे एक युट्यूब चॅनेलदेखील आहे. तितीक्षा तावडे ही युट्यूबवरील व्लॉगच्या माध्यमातून तिच्या आयुष्यातील काही खास क्षण तिच्या चाहत्यांबरोबर शेअर करत असते. (Titeeksha Tawde shared last day shooting)

सेटवरील मजामस्ती, आयुष्यातील काही खास क्षण, तसंच वैयक्तिक व कामावरील काही लेटेस्ट अपडेट्स तितीक्षा तिच्या या युट्यूब चॅनेलवरील व्हिडीओच्या माध्यमातून शेअर करत असते. अशातच तितीक्षाची ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला आणि याच निरोपानिमित्त तिने एक खास व्हिडीओ तिच्या युट्यूब चॅनेलद्वारे शेअर केला आहे. या व्हिडीओमधून तितीक्षाने मालिकेच्या शेवटच्या दिवसाच्या शूटिंगची संपूर्ण झलक दाखवली आहे. तसंच या व्हिडीओमध्ये तितीक्षाचा नवरा सिद्धार्थ तिला धीर देतानाचेही पाहायला मिळत आहे.

View this post on Instagram

A post shared by Jayaant Pawar (@jayaantpawar)

आणखी वाचा – शिवानी सोनारची लगीनघाई सुरु, घरच्यांनी केलं साग्रसंगीत केळवण, फोटो सोशल मीडियावर व्हायरल

या व्हिडीओमध्ये ती शेवटच्या दिवशी सेटवर लवकर पोहोचते आणि या खास दिवसासाठी ती ऐश्वर्या नारकरांनी भेट म्हणून दिलेला खास ड्रेस परिधान करते. यानंतर हळूहळू सेटवर सगळे येतात. यावेळी सर्वांच्याच डोक्यात हेच चालू असतं की, त्यांचा या सेटवरील शेवटचा दिवस आहे. पुढे नेत्रा कलाकारांचचे मेकअप कशाप्रकारे केले जाते याचीही झलक या व्हिडीओमधून दाखवते. त्यानंतर शतग्रीवच्या वधाचा सीन कसा शूट केला गेला? याचेही खास दृश्य ती यातून दाखवते. पुढे शेवटच्या सीनचे शूटिंग आणि त्यानंतर कलाकारांच्या सेलिब्रेशनची ही खास झलक तितीक्षाच्या या व्हिडीओमधून पाहायला मिळत आहे. मालिकेच्या शेवट होत असल्याने साहजिकच सर्व कलाकार व तंत्रज्ञ मंडळी भावुक होतात.

आणखी वाचा – Paataal Lok Season 2 ‘या’ दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीला, जयदीप अहलावतच्या नव्या पोस्टरने वेधलं लक्ष

यानंतर निरोपाच्या क्षणी मालिकेचे दिग्दर्शक कलाकारांना त्यांच्या शेवटच्या प्रतिक्रिया विचारतात. यावेळी तितीक्षा, ऐश्वर्या यांसह सगळेच मंडळी भावुक होतात. मालिकेतील दोन लहान मुलींनाही रडू कोसळतं. त्यांना त्यांच्या प्रतिक्रिया विचारल्या असता, त्या रडू लागतात. यानंतर सेटवर कलाकारांकडून खास सलिब्रेशन केलं जातं. त्यानंतर अखेर नेत्रा म्हणजेच तितीक्षा या सेटची खास झळक प्रेक्षकांना दाखवते आणि या वास्तूला आता अखेरचा निरोप देते. तितीक्षाचा हा व्हिडीओ पाहून प्रेक्षक म्हणूनही अश्रु अनावर होतात. दरम्यान, या व्हिडीओखालीही प्रेक्षकांनी भावुक कमेंट्स शेअर केल्या आहेत.

Tags: saatvya mulichi saatvi mulgiSatvya Mulichi Satavi Mulgi off airTiteeksha Tawde shared last day shooting
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Dia Mirza Pregnancy
Women

…अन् गरोदरपणात दिया मिर्झाला झाला नको तो संसर्ग, लेकाच्या जीवावरही बेतलं, ३६ तासांनी शस्त्रक्रिया झाली आणि…

जून 7, 2025 | 10:00 am
Aamir khan talk about his girlfriend
Entertainment

“प्रेम लपवणं म्हणजे तिचा अपमान”, ६०व्या वर्षी तिसऱ्यांदा प्रेम, गर्लफ्रेंडबाबत बोलला आमिर खान, नातं जगजाहिर केलं कारण…

जून 6, 2025 | 7:00 pm
Anushka Sharma And Virat Kohli
Entertainment

IPLमध्ये विराट कोहलीचा विजय पण अनुष्का शर्मा झाली श्रीमंत, तब्बल इतकी आहे संपत्ती, एकूण कमाई…

जून 6, 2025 | 6:00 pm
muzammil Ibrahim on pooja bhatt
Entertainment

“कलाकार कुत्र्यांसारखे असतात, शिवीगाळी करुन…”, पूजा भट्टवर सुप्रसिद्ध अभिनेत्याचे गंभीर आरोप, घाणेरडी वागणूक दिली अन्…

जून 6, 2025 | 5:00 pm
Next Post
deepika old video viral

२० वर्षांपूर्वी अशी दिसायची दीपिका पदुकोण, चेहराही होता खूपच वेगळा, जुना व्हिडीओ तुफान व्हायरल

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.