Uday tikekar Birthday : बाप-मुलीचं नातं हे सर्व नात्यांमध्ये फार जिव्हाळ्याचं नातं आहे. सर्वसामान्यांबरोबर अनेक कलाकार मंडळींमध्येही वडील-मुलीची जोडी पाहायला मिळते. अनेक कलाकारांची मुलं आहेत ज्यांनी आई-वडिलांच्या पाठोपाठ अभिनय क्षेत्रात पाऊल टाकलं आहे. या कलाकारांच्या लेकी नेहमीच चर्चेत असतात. अभिनेत्री स्वानंदी टिकेकर ही अभिनेते उदय टीकेकर व गायिका आरती अंकलीकर-टीकेकर यांची मुलगी आहे. स्वानंदीची आई शास्त्रीय गायिका आहेत तर वडील दिग्गज अभिनेते आहेत. टिकेकर कुटुंब सिनेविश्वात व सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असलेले पाहायला मिळतात. उदय टिकेकर यांनी आजवर अनेक मालिका, चित्रपट, नाटक यांमधून महत्त्वपूर्ण भूमिका साकारत प्रेक्षकांची मन जिंकली आहेत.
नुकताच उदय टिकेकर यांचा वाढदिवस झाला. त्यांच्या वाढदिवसाची खास झलक समोर आली आहे. स्वानंदीने वडिलांच्या वाढदिवसाची झलक तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केली आहे. “बर्थडे बॉय. माझा सर्वोत्तम माणूस”, असं कॅप्शन देत तिने हा व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये स्वानंदी, तिची आई व वडील पाहायला मिळत आहेत. स्वानंदीने तिच्या बाबांचा वाढदिवस अगदी दणक्यात साजरा केला आहे. सुंदर अशा व्हिडीओमध्ये केक कट करताना स्वतः उदय हे डान्स करताना दिसत आहेत. उदय यांच्या वाढदिवसाला टिकेकर कुटुंब एकत्र पाहायला मिळालं. तर यावेळी त्यांचा जावई आशिष कुलकर्णी याची अनुपस्थिती असल्याचं दिसतंय, कारण व्हिडीओमध्ये आशिषची झलक पाहायला मिळाली नाही.
आणखी वाचा – Tharla Tar Mag : सायली-अर्जुन एकमेकांच्या प्रेमात, लवकरच देणार प्रेमाची कबुली, उत्सुकता वाढली
स्वानंदीने शेअर केलेल्या या व्हिडीओला अनेकांनी पसंती दर्शविली असून उदय यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. स्वानंदीने शेअर केलेल्या व्हिडीओखाली कलाकार मंडळींनीही त्यांना शुभेच्छा दिलेल्या पाहायला मिळत आहेत. मानसी नाईक, यशोमन आपटे, शरयू दाते, कविता मेढेकर या कलाकार मंडळींनी शुभेच्छा दिल्या आहेत. तर उदय यांनी वाढदिवस दणक्यात साजरा केल्याने कमेंटमध्ये स्वानंदीचे आभारही मानले आहेत.
आणखी वाचा – ‘पुष्पा २’ने रचला इतिहास, ठरला हिंदीतील ब्लॉकबस्टर चित्रपट, शाहरुख खानच्या ‘जवान’लाही टाकलं मागे
उदय यांनी ‘लव्ह यु बेटा’, असं म्हणत स्वानंदीचे आभार मानत कौतुक केलं आहे. स्वानंदी व उदय यांच्यातील बॉण्ड नेहमीच आपल्याला सोशल मीडियावर पाहायला मिळतो. वडील-मुलीच्या नात्यापेक्षा त्यांच्यात मैत्री अधिक आहे. सोशल मीडियावर ही बाप-लेकीची जोडी नेहमीच काही ना काही शेअर करत असते.