सिनेसृष्टीत सध्या लगीनघाई सुरु असलेली पाहायला मिळत आहे. एकामागोमाग एक कलाकार मंडळी लग्नबंधनात अडकत असल्याचं पाहायला मिळत आहे. काही दिवसांपूर्वी एका जोडीने लग्नसोहळा करत चाहत्यांना धक्का दिला. ही लोकप्रिय जोडी म्हणजे अभिनेत्री सुरुची अडारकर व अभिनेता पियुष रानडे. थेट लग्नाचे फोटो शेअर करत सुरुची व पियुष यांनी चाहत्यांना खूप मोठा धक्का दिला. त्यांनी त्यांच्या नात्याची चाहूल न लागू देता त्यांच्या लग्नसोहळ्याचे फोटो शेअर केले. (Suruchi Adarkar Mangalsutra Design)
सुरुची व पियुष यांच्या शाही विवाहसोहळ्याचे फोटो समोर आले तेव्हा चाहत्यांनी या फोटोला भरभरुन प्रतिसाद दिलेला पाहायला मिळाला. अगदी पारंपरिक अंदाजात त्यांनी हा विवाहसोहळा उरकला. लग्नासाठी सुरुची व पियुष यांचा खास लूक पाहणं रंजक ठरलं. सुरुचीने पिवळ्या रंगाची साडी नेसली होती. तसेच तिच्या दागिन्यांनीही विशेष लक्ष वेधून घेतलं. तर पियुषने सुरुचीच्या लूकला साजेसा पोशाख परिधान केला आहे. सुरुचीने लग्नानंतर ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ या मालिकेतून मालिकाविश्वात कमबॅक केलं.
‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ या मालिकेतील तिची सहकलाकार तितीक्षा तावडे नुकतीच लग्नबंधनात अडकली आहे. तितीक्षाने अभिनेता सिद्धार्थ बोडकेसह लग्नगाठ बांधली. तितीक्षाच्या लग्नाला सुरुचीचा पारंपरिक अंदाज लक्षवेधी ठरला. यावेळी सुरुचीने लाल रंगाची पारंपरिक साडी नेसली होती. सुरुची या सिंपल लूकमध्ये खूप सुंदर दिसत होती. दरम्यान अभिनेत्रीच्या गळ्यातील मंगळसूत्राने साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं.
सुरुचीने घातलेलं हे सोन्याचं मंगळसूत्र खूप खास दिसत होतं. अगदी पारंपरिक डिझाइन असलेल्या या मंगळसूत्राने तिच्या सौंदर्यात आणखीनच भर घातली होती. सुरुचीच्या मंगळसूत्रात मोजके काळे मणी व भरपूर सोनं असलेलं पाहायला मिळत आहे. दोन वाट्याचे पेंडेंट व काळ्या मणीमध्ये सोन्याचे असलेले मणी अशा या मंगळसूत्रावरून नजर हटत नाही आहे. सुरुचीच्या या मराठमोळ्या लूकवर अनेकांनी कमेंट व लाईक्सचा वर्षाव केलेला पाहायला मिळत आहे.