Pooja Sawant Siddhesh Chavan Wedding : ‘मन धागा धागा जोडते नवा’ म्हणत मराठीसह हिंदी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी ‘कलरफुल’ अभिनेत्री म्हणजे पूजा सावंत. आपल्या सहजसुंदर अभिनयाने, निरागस हास्याने व मनमोहक सौंदर्याने पूजाने अनेकांच्या हृदयात आपलं स्थान निर्माण केलं आहे. आपल्या अभिनयाने व हटके स्टाईलमुळे नेहमीच चर्चेत राहणारी पूजा गेले काही दिवस तिच्या लग्नामुळे चर्चेत आली आहे. गेले काही दिवस अभिनेत्रीच्या घरी लग्नाची धामधूम पाहायला मिळत आहे. नुकताच पूजाचा संगीत व हळदी समारंभ पार पडला. याचे काही फोटो व व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले.
अशातच आता पूजाचा शुभविवाहदेखील पार पडला आहे. गेले काही दिवस पूजाच्या संगीत, हळदी तसेच लग्नाआधीच्या काही विधींचे फोटो व व्हिडीओ सोशल मीडियावर झालेले पाहायला मिळाले. या फोटो व व्हिडीओना चाहत्यांकडूनही चांगलाच प्रतिसाद मिळाला. अशातच आता तिच्या लग्नाचे काही खास क्षणही सोशल मीडियावर शेअर करण्यात आले आहेत.अखेर पूजा सिद्धेश चव्हाणसह लग्नबंधनात अडकली आहे.
पूजा व सिद्धेशच्या शाही विवाहसोहळ्याचे फोटो सोशल मीडियावरून तुफान वायरल होत आहेत. पूजा व सिद्धेशच्या रिसेप्शन लूकने साऱ्यांच लक्ष वेधून घेतले. अखेर पूजा सिद्धेश चव्हाणसह लग्न बंधनात अडकली आहे. पूजा व सिद्धेशच्या शाही विवाह सोहळ्याचे फोटो सोशल मीडिया वरून तुफान वायरल होत आहे. लाल भरजरी साडीमध्ये या नववधूचं सौंदर्य खुलून आलेलं पाहायला मिळालं. तर सिद्धेशने कुर्ता पायजमा व त्यावर शॉल असा वेस्टर्न अंदाज केलेला पाहायला मिळाला.
बॉलीवूडमधील लोकप्रिय जोडी म्हणजेच विराट कोहली व अनुष्का शर्मा यांच्या लग्नातल्या काहीशा ड्रेसिंगसारखीच पूजा व सिद्धेशची ड्रेसिंग असल्याच्या चर्चा सोशल मीडियावर रंगलेल्या पाहायला मिळत आहेत. पूजाचा नवरा हा कामासाठी ऑस्ट्रेलिया येथे असून सध्या तो लग्नासाठी भारतात परतला आहे. पूजाचा नवरा हा मूळचा मुंबईचा असून त्यांचं अरेंज मॅरेज आहे. पूजा सावंत व सिद्धेश चव्हाण अखेर लग्न बंधनात अडकले असून दोघांची जोडी खूपच सुंदर दिसत आहे. पूजाच्या पारंपरिक टच असलेल्या मॉडर्न अंदाजानं साऱ्यांना भुरळ घातली आहे. भरजरी साडीमध्ये या नववधूचं सौंदर्य खुलून आलेलं पाहायला मिळालं. तर सिद्धेश कुर्ता व पायजमा व त्यावर नक्षीदार शॉल असा वेस्टर्न अंदाज केलेला पाहायला मिळाला.