शुक्रवार, जून 6, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“भूमिकेविषयी कळताच पियुष…”, लग्नानंतर मालिकेत काम करताना सुरुचीच्या नवऱ्याची प्रतिक्रिया काय होती?, म्हणाली, “आमच्यामध्ये…”

Saurabh Moreby Saurabh More
जानेवारी 5, 2024 | 1:15 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
actress suruchi adarkar spoken about her husband's reaction about new role in satvya mulichi satavi mulgi

“भूमिकेविषयी कळताच पियुष…”, लग्नानंतर मालिकेत काम करताना सुरुचीच्या नवऱ्याची प्रतिक्रिया काय होती?, म्हणाली, “आमच्यामध्ये…”

झी मराठीवरील ‘का रे दुरावा?’ या मालिकेतून घराघरांत पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे सुरुची अडारकर. या मालिकेमुळे सुरुचीला प्रचंड लोकप्रियता मिळाली होती. आजही ही मालिका अनेकांची लोकप्रिय मालिका आहे. अशातच गेल्या महिन्यात ही अभिनेत्री अभिनेता पियुष रानडेबरोबर विवाहबंधनात अडकल्यामुळे चांगलीच चर्चेत आली. लग्नामुळे चर्चेत असलेली अभिनेत्री सुरुची अडारकार आता पुन्हा एकदा चर्चेत आली आहे आणि या चर्चेचं कारण म्हणजे अभिनेत्री लवकरच एका नव्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. (Suruchi Adarkar Interview)

सुरुचीने झी मराठी वाहिनीवरील ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ या मालिकेतून पुन्हा एकदा कमबॅक केले आहे. ‘का रे दुरावा’ मालिकेत सुरुचीने साकारलेली अदिती खानोलकर ही भूमिका खूपच गाजली होती. त्यानंतर आता सुरुची पुन्हा त्याच वाहिनीवर पुनरागमन करत आहे. ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ या मालिकेत ती नगिनीच्या भूमिकेत दिसणार आहे. नुकताच या मालिकेचा एक नवीन प्रोमोसमोर प्रेक्षकांच्या भेटीला आला असून यात सुरुचीची एक झलक पाहायला मिळाली आहे आणि अल्पावधीतच या प्रोमोला चाहत्यांनी लाईक्स व कमेंट्सद्वारे चांगलाच प्रतिसाद दिला आहे. अशातच सुरुचीने तिच्या या नवीन भूमिकेबद्दल इट्स मज्जाला तिची प्रतिक्रिया दिली आहे.  

आणखी वाचा – १७६ रुम, पाहुणेमंडळी अन्…; उदयपूरमध्ये पुन्हा एकदा होणार आमिर खानच्या लेकीचं लग्न, शाही विवाहसोहळ्याची तयारी सुरु

यावेळी तिला ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’मधील तुझ्या भूमिकेबाबत पियुषला कळल्यावर त्याची काय प्रतिक्रिया होती?’ असा प्रश्न विचारण्यात आला. यावेळी ती म्हणाली, “अगदी खरं सांगायचं तर आम्ही एकमेकांच्या कामामध्ये कधीच येत नाही. पण या मालिकेत काम करण्याचा जेव्हा मी निर्णय घेतला, तेव्हा आमच्यामध्ये अगदी चांगली चर्चा झाली. पियुषला सांगितल्यानंतर तोही अगदी उत्साही होता. त्याचंही तेच म्हणणं होतं की, तू आजवर अशी कोणतीच भूमिका केली नाही. त्यामुळे तुलाही हे काम करताना खूप मजा येईल. त्यामुळे या नव्या भूमिकेसाठी मीही खूप उत्साही आहे.”

आणखी वाचा – “तुमच्यामुळे महाराष्ट्राची संस्कृती…”, ‘त्या’ बोल्ड फोटोंमुळे सई ताम्हणकर ट्रोल, नेटकरी संतापून म्हणाले, “शोभतं का हे?”

दरम्यान, आता लग्नानंतर सुरुची-पियुष आपापल्या कामात व्यस्त झाले असल्याचे पाहायला मिळत आहे. पियुषने लग्नानिमित्ताने ‘काव्यांजली’ या मालिकेतून ब्रेक घेतला होता, पण तो आता पुन्हा एकदा या मालिकेत दिसणार आहे. तर सुरुचीही तिच्या नव्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. त्यामुळे तिचे अनेक चाहते तिला पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर पाहण्यासाठी चांगलेच उत्सुक आहेत हे नक्की.

Tags: entertainment newsmarathi actressmarathi entertainmentMarathi newsmarathi serialsaatvya mulichi saatvi mulgiSuruchi Adarkar
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Aamir khan talk about his girlfriend
Entertainment

“प्रेम लपवणं म्हणजे तिचा अपमान”, ६०व्या वर्षी तिसऱ्यांदा प्रेम, गर्लफ्रेंडबाबत बोलला आमिर खान, नातं जगजाहिर केलं कारण…

जून 6, 2025 | 7:00 pm
Anushka Sharma And Virat Kohli
Entertainment

IPLमध्ये विराट कोहलीचा विजय पण अनुष्का शर्मा झाली श्रीमंत, तब्बल इतकी आहे संपत्ती, एकूण कमाई…

जून 6, 2025 | 6:00 pm
muzammil Ibrahim on pooja bhatt
Entertainment

“कलाकार कुत्र्यांसारखे असतात, शिवीगाळी करुन…”, पूजा भट्टवर सुप्रसिद्ध अभिनेत्याचे गंभीर आरोप, घाणेरडी वागणूक दिली अन्…

जून 6, 2025 | 5:00 pm
Who Is Hina Khan Husband
Entertainment

हिना खानचा नवरा नक्की कोण आहे आणि काय करतो?, अभिनेत्रीला कॅन्सर झाला तेव्हा घेत होता काळजी, कमाई आहे तब्बल…

जून 6, 2025 | 4:00 pm
Next Post
bigg boss 17 updates ankita lokhande evicted abhishek kumar from the show see details

Bigg Boss 17 : अंकिता लोखंडेच्या सांगण्यावरुन ‘बिग बॉस’मधील ‘हा’ स्पर्धक घराबाहेर, निर्णय ऐकून प्रेक्षकही भडकले

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.