शुक्रवार, सप्टेंबर 11, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“स्वत:चे खिसे भरण्यापूरतेच…”, फिल्मफेअर गुजरातला होणार समजताच भडकले जितेंद्र आव्हाड, म्हणाले “अक्षय कुमारला…”

Saurabh Moreby Saurabh More
जानेवारी 17, 2024 | 3:03 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
ncp mla Jitendra Awhad shared angry post on 69th Filmfare Awards held in Gujarat

“स्वत:चे खिसे भरण्यापूरतेच...”, फिल्मफेअर गुजरातला होणार समजताच भडकले जितेंद्र आव्हाड, म्हणाले “अक्षय कुमारला...”

बॉलिवूड मनोरंजन सृष्टीत अनेक पुरस्कार सोहळ्यांपैकी फिल्मफेअर हा अतिशय मानाचा व महत्त्वाचा पुरस्कार मानला जातो. या पुरस्काराचं यंदाचं ६९वं वर्ष आहे. यंदाचा हा ६९वा फिल्मफेअर पुरस्कार सोहळा गुजरातच्या गांधीनगर गिफ्ट सिटी येथे येत्या २७ व २८ जानेवारी रोजी पार पडणार आहे. दरवर्षी मुंबईत या पुरस्कार सोहळ्याचं आयोजन करण्यात येतं. परंतु, यंदा हा सोहळा गुजरात टुरिजमच्या साहाय्याने गिफ्ट सिटी येथे आयोजित करण्यात आला आहे. यावर अनेकांनी नाराजी व्यक्त केली असून विरोधकांनी सरकारवर निशाणा साधला आहे. अशातच राष्ट्रवादी कॉँग्रेस पार्टी पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी एक्स (ट्विटर)वर एक पोस्ट शेअर केली आहे.

जितेंद्र आव्हाड यांनी या पोस्टमध्ये असे म्हटले आहे की, “भारतीय चित्रपटसृष्टी आणि मुंबई यांचं नातं जवळ जवळ १०० वर्ष जुनं आहे. याच मुंबईत अनेक कलावंत, गायक, चित्रपट, गाणी तयार झाली. भारतातील सर्वाधिक सिनेमागृहे याच शहरात होती. पाकिस्तानातून विस्थापित झालेल्या कुटुंबाने याच चित्रपटसृष्टीतून कोट्यवधी रूपये कमावले. भाजीपावच्या गाडीवर काम करणारा अक्षय कुमार याला या मातीचा स्पर्श होताच तो अब्जाधीश झाला. किती नावे घ्यावीत; घेऊ तेव्हढी कमीच आहेत. या मराठी मातीच्या परिसस्पर्शामुळे चित्रपटसृष्टीची भरभराट होत गेली”.

भारतीय चित्रपटसृष्टी आणि मुंबई यांचे नाते जवळ-जवळ १०० वर्ष जुने आहे. याच मुंबईत अनेक कलावंत, गायक, अनेक चित्रपट, अनेक गाणी तयार झाली. भारतातील सर्वाधिक सिनेमागृहे याच शहरात होती. पाकिस्तानातून विस्थापित झालेल्या कुटुंबाने याच चित्रपटसृष्टीतून कोट्यवधी रूपये कमावले. भाजीपावच्या…

— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) January 17, 2024

हेही वाचा – ‘मिर्झापुर ३’, ‘महाराणी ३’, अन् ‘आश्रम ४’; ‘या’ दिवशी प्रदर्शित होणार बहुचर्चित वेबसीरिज, कुठे पाहता येणार?

“निदान या कलाकारांनी तरी या मातीची ओळख ठेवायला हवी होती. फिल्मफेअर अ‍ॅवॉर्ड मुंबईतून हलवला जात आहे. त्याविरोधात एकही कलावंत ब्र उच्चारण्यास तयार नाही. म्हणजेच, मराठी मातीचा उपयोग फक्त या लोकांनी स्वतःचे खिसे भरण्यापुरतेच केला. एकेकाची घरे शंभर-दीडशे कोटींची आहेत. त्यांनी हे पैसे मेहनतीने कमावले; पण, या मातीतूनच कमावले, हेदेखील महत्त्वाचे आहे. थोडी तरी या शहराबद्दल प्रेम-आपुलकी असती तर एखादा कलाकार तरी बोलला असता. पण, कोणी बोलेल, असे दिसत नाही”.

हेही वाचा – नीना गुप्तांनी पहिल्यांदाच शेअर केला दुसऱ्या लग्नाचा फोटो, लग्नात लेकही होती उपस्थित अन्…; फोटो तुफान व्हायरल

“१०५ हुतात्म्यांनो, माफ करा आम्हाला! तुम्ही अतिशय मेहनतीने मुंबई महाराष्ट्राला दिली. या मुंबईने देशाला पोसले. या मुंबईने आंतरराष्ट्रीय प्रतिमा निर्माण केली; जगात एक स्वतःची ओळख निर्माण केली. त्या मुंबईचे महत्त्व कमी करण्याचे काम जर झालं असेल आणि आम्ही मराठी माणूस, मग तो कुठल्याही जाती-धर्माचा का असेना तो जर शांत बसत असेल तर तुम्हा हुतात्म्यांना नक्कीच वाटत असेल की, आम्ही कशाला छातीवर गोळ्या झेलल्या? माफ करा आम्हाला!”. दरम्यान, जितेंद्र आव्हाड यांचं हे ट्वीट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Tags: 69th Filmfare Awardsअक्षय कुमारफिल्मफेअर पुरस्कारमनोरंजन बातमीबॉलिवूड मनोरंजन बातमी६९वा फिल्मफेअर पुरस्कारakshay kumarBollywood Entertainment Newsजितेंद्र आव्हाडentertainment newsFilmfare Awardsjitendra awhad
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Kaakul Marathi Movie
Entertainment

‘काकुळ’च्या थरारक रहस्याचा उलगडा होणार नोव्हेंबरमध्ये, मोनालिसा बागलची प्रमुख भूमिका

सप्टेंबर 9, 2026 | 9:50 am
Dashami Movie Song
Entertainment

‘बुरी नजर वाले.. तेरा मुँह काला’ चा स्वॅग, ‘दशमी’ चित्रपटाचं हटके गाणं चर्चेत

सप्टेंबर 9, 2026 | 9:40 am
Daryabhavani Marathi Movie
Entertainment

‘दर्याभवानी’ साठी दिग्पाल लांजेकरांचे अनोखं गाऱ्हाणं, शूटिंगला सुरुवात, होणार ‘या’ दिवशी प्रदर्शित

सप्टेंबर 9, 2026 | 9:32 am
Bandhkhor Marathi Movie
Entertainment

सहा स्त्रियांच्या बंडाची कहाणी उलगडणार ‘बंडखोर’मधून, सुनेत्रा अजित पवार आणि सुनील गावस्कर यांच्या उपस्थितीत ट्रेलर प्रदर्शित

सप्टेंबर 8, 2026 | 1:48 pm
Next Post
Akshaya Naik On Atal Setu Bridge

"सर्व सामान्यांना टोल परवडेल का?", अटल सेतूबाबत व्हिडीओ शेअर करताच अक्षया नाईकला नेटकऱ्याने सुनावलं, म्हणाली, "टॅक्सीमध्ये वेळ…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.