यंदा दिवाळीनिमित्त सर्वत्र आनंदाचं व उत्साहाचं वातावरण पाहायला मिळत आहे. सर्वसामान्यांपासून ते दिग्गजांपर्यंत सर्वजण दिवाळी मोठ्या धूमधडाक्यात साजरी करताना दिसत आहेत. दिवाळीनिमित्त अनेक बॉलिवूड कलाकारांच्या घरी पार्ट्यांचे आयोजन करण्यात येते. तर मराठमोळे कलाकारदेखील आपल्या मित्रपरिवार व प्रियजनांबरोबर दिवाळी साजरी करताना दिसत आहेत आणि हा आनंद ते आपल्या सोशल मिडियाद्वारे चाहत्यांबरोबर शेअरही करतात. अशातच मराठी अभिनेत्री तितिक्षा तावडेने तिच्या सोशल मीडियावरून एक खास व्हिडीओ शेअर केला आहे. (Actress Titeeksha Tawde Shared Diwali Special Video)
तितिक्षाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यात ती जेवण करताना दिसत आहे. अभिनेत्रीने शेअर केलेल्या या व्हिडीओत स्वत: तितिक्षा, तिची बहीण खुशबू तावडे त्याचबरोबर त्यांची आई व भाऊ दिसत आहे. या व्हिडीओत तितिक्षा, खुशबू आणि त्यांची आई जेवण बनवताना दिसत असून त्यांनी बिर्याणी, पुरी असा रुचकर जेवणाचा बेत केलेला दिसत आहे. तिने शेअर केलेल्या या व्हिडीओत तितिक्षा पुरी करत आहे तर तिची आई पुरी तळताना दिसत आहे आणि खुशबू ही बिर्याणी बनवताना दिसत आहे. त्याचबरोबर त्यांचा भाऊ त्यांना मदत करताना दिसत आहे.
एकूणच या व्हिडीओत तावडे कुटुंबीय अगदी आनंदाने स्वयंपाक करताना दिसत आहेत. यामुळे त्यांच्यातील चांगला बॉण्डदेखील दिसून येत आहे. त्यांच्यातील हा बॉण्ड चाहत्यांनादेखील आवडला असल्याचे दिसत आहे. या व्हिडीओखाली अनेकांनी प्रतिक्रिया व्यक्त करत त्यांच्या जेवण बनवण्याच्या आनंदात स्वत:ला ही सहभागी करून घेतले आहे. नेटकऱ्यांनी कमेंट्समध्ये ‘किती गोड’, त्याचबरोबर आनंदी आणि हार्टचे इमोजीस् देत त्यांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
दरम्यान तितिक्षा व खुशबू या दोघीही मनोरंजन क्षेत्रात कार्यरत आहेत. तितिक्षा सध्या ‘झी मराठी’वाहिनीवरील ‘सातव्या मुलीची सातवी गोष्ट’ या मालिकेत नेत्राची भूमिका करत आहे तर खुशबू ही ‘सारं काही तिच्यासाठी’ या मालिकेतून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. दोघीही सोशल मीडियावरुन आपल्या चाहत्यांबरोबर फोटो, व्हिडीओ शेअर करत असतात.