गेले काही दिवस अभिषेक बच्चन व ऐश्वर्या राय ही जोडी चांगलीच चर्चेत आहे. काही मीडिया रिपोर्टनुसार अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन आणि तिचा पती व अभिनेता अभिषेक बच्चन यांच्यात काहीही आलबेल नसून ते दोघे घटस्फोट घेणार असल्याचे वृत्त आहे. कया. काही दिवसांपूर्वी अभिषेक व निम्रत कौर यांच्या नात्याबद्दलही अनेक चर्चा सोशल मीडियावर होताना दिसत आहेत. दरम्यान, अभिनेत्री सिमी ग्रेवालने सोशल मीडियावर बच्चन कुटुंबाचा बचाव केला आहे. बच्चन कुटुंबाशी घनिष्ठ नातेसंबंधांसाठी ओळखले जाणारी सिमी ग्रेवालने अभिषेकचा एक जुना व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये तो नातेसंबंधांमधील बांधिलकी आणि निष्ठा यावर आपले मत व्यक्त करत आहे. (Abhishek Bachchan on Commitment In Relationships)
सिमी ग्रेवालने शेअर केलेला व्हिडीओ तिच्या लोकप्रिय शो Rondeevu with Simi Grewal मधील आहे, ज्यामध्ये अभिषेकने २००३ मध्ये सहभाग घेतला होता. या व्हिडीओमध्ये, अभिनेता असं म्हणाला की, “मला जुन्या पद्धतीचा म्हणा, परंतु मला मनमोकळ्या स्वभावाच्या लोकांबरोबर राहायला काहीच हरकत नाही. मला मजा करायची इच्छा असलेल्या लोकांमध्ये राहण्यात काही अडचण नाही. परंतु जर तुम्ही कोणत्याही स्तरावर एखाद्याशी वचनबद्धता केली असेल तर त्या वचनबद्धतेचे पालन करा, अन्यथा, ते नातेच बनवू नका”.
अभिनेता पुढे म्हणाला होता की, “मला वैयक्तिकरित्या असे वाटते की एक पुरुष म्हणून, जर तुम्ही एखाद्या स्त्रीशी वचनबद्ध असाल, जरी तुमचा तिच्या प्रियकराशी सामना झाला तरी तुम्ही तिच्याप्रती विश्वासू राहिले पाहिजे. पुरुषांवर सहसा खूप अविश्वासू असल्याचा आरोप केला जातो, मला हे कधीच समजले नाही आणि मी याच्याशी सहमत नाही. याचा मला राग येतो”. सिमीने यापूर्वी एका सोशल मीडिया पोस्ट केली होती आणि तिने असं म्हटलं होतं की अमिताभ यांनी त्यांची मुलगी श्वेता बच्चन नंदासाठी ऐश्वर्या रायकडे दुर्लक्ष केले.
आणखी वाचा – मोठा निर्णय! श्रद्धा कपूरने थेट नाकारला ‘पुष्पा २’, क्षणाचाही विचार न करता मोठी चूक कारण…
दरम्यान, ऐश्वर्या रायने ०१ नोव्हेंबरला तिचा ५१ वा वाढदिवस साजरा केला. आश्चर्याची गोष्ट म्हणजे बच्चन कुटुंबाने अभिनेत्रीला शुभेच्छा देण्यासाठी कोणतीही पोस्ट शेअर केली नाही. चाहत्यांनी याची खूप दखल घेतली. याआधी जुलैमध्ये ऐश्वर्या रायने अनंत अंबानींच्या लग्नात मुलगी आराध्याबरोबर हजेरी लावली होती. तेव्हापासून अभिषेक व ऐश्वर्या यांच्या नात्याबद्दलच्या चर्चा होत आहेत.