Nikki Tamboli And Arbaaz Patel : ‘बिग बॉस मराठी’ सीझन ५ मुळे अनेक नाती जुळली आणि ही नाती चर्चेतही राहिलेली पाहायला मिळाली. ‘बिग बॉस’च्या घरात काही भावा बहिणींचे नाते तर काहींमध्ये प्रेमाचे बंधही फुलताना पाहायला मिळाले. यंदाच्या या पर्वात निक्की तांबोळी आणि अरबाज पटेलची विशेष चर्चा रंगलेली पाहायला मिळाली. ‘बिग बॉस’च्या ग्रँड प्रिमीयरपासूनच ही जोडी एकत्र एंट्री घेताना दिसली. दोघांनी शोमध्ये येण्याच्या अगदी पहिल्या दिवसापासून प्रेक्षकांच्या मनात जागा निर्माण केली. या शोमध्ये येताना दोघेही एकत्र आले त्यामुळे त्यांच्यात आपसूकच मैत्री झालेली पाहायला मिळाली आणि कालांतराने या मैत्रीचे रुपांतर प्रेमात होताना झालेले दिसलं.
अरबाज व निक्की एकमेकांसाठी लढताना, एकमेकांसाठी खेळताना तसेच एकमेकांना आधार देताना दिसले. बरेचदा दोघे एकमेकांबरोबर वेळ घालवताना दिसले. टास्क दरम्यान अरबाज निक्कीच्या मागे खंबीरपणे उभा राहताना दिसला. एकूणच त्यांच्या या मैत्रीचं नेहमीच कौतुक केलं गेलं. मात्र बरेचदा अरबाज व निक्कीमध्ये वादही झालेले पाहायला मिळाले. एकमेकांच्या मनाला गोष्टी न पटल्याने त्यांच्यात वाद झाल्याचं दिसलं. मात्र हे वाद कालांतराने मिटत गेले आणि त्यांची मैत्री पुन्हा उभारत गेली.
‘बिग बॉस’च्या घराबाहेर आल्यानंतरही ही जोडी बरेचदा एकत्र फिरताना दिसली. ‘बिग बॉस’मधून बाहेर पडल्यानंतर या जोडीमधील प्रेमाचे बंध अधिक दृढ होताना पाहायला मिळाले. नुकतीच ही जोडी एकत्र स्पॉट होताना दिसली. यावेळी निक्की व अरबाजला पाहून पापाराझींनी प्रश्नाचा भडीमार केला. दोघांना एकत्र पाहून निक्कीला त्यांनी वहिनी म्हणून हाक मारलेली पाहायला मिळाली.
आणखी वाचा – धनंजय पोवारसाठी अंकिता वालावलकरने कोकणातून पाठवली खास भेट, शेअर केला व्हिडीओ, अनोखं सरप्राइज अन्…
जेव्हा पापाराझीने ‘निक्की वहिनी’ म्हणून हाक मारली तेव्हा ती लाजली. वहिनी म्हणून हाक ऐकताच तिला आश्चर्याचा धक्का बसला. म्हणूनच ती तोंडावर हात ठेवून मागे फिरताना दिसत आहे. तिच्याबरोबर अरबाजही हसताना दिसला. मग पापाराझींनी दोघांना दिवाळी कशी साजरी करत आहात? असं विचारलं. त्यावर दोघं म्हणाले, “आम्ही आमच्या कुटुंबाबरोबर दिवाळी साजरी करत आहे”.