मराठी मालिकाविश्वात अनेक नवनवीन कलाकारांची एन्ट्री होताना चित्र सध्या दिसत आहे. यात काही कलाकार असे आहेत, ज्यांनी त्यांच्या उत्तम अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनात घर निर्माण करण्यात यशस्वी ठरले. या कलाकारांपैकी एक म्हणजे शिवानी सोनार. कलर्स मराठीवरील ‘राजा राणीची गं जोडी’ या लोकप्रिय मालिकेतून ती घराघरात पोहचली. तिने साकारलेली संजीवनी ढाले-पाटील ही भूमिका प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस उतरली होती. या मालिकेला निरोप घेऊन बरेच महिने झाले. पण चाहते तिला प्रचंड मिस करत होते. (Shivani Sonar in Sindhutai Mazi Mai Serial)
अशातच अभिनेत्रींच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. शिवानी सोनार लवकरच याच वाहिनीवरील आणखी एका मालिकेतून छोट्या पडद्यावर पुन्हा एकदा झळकणार आहे. ‘सिंधुताई माझी माई – गोष्ट चिंधीची’ ही मालिका काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. ज्याला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. थोर समाजसेविका सिंधुताई सपकाळ यांच्या जीवनावर आधारित या मालिकेत बालकलाकार अनन्या टेकवडे आपल्याला छोट्या चिंधीच्या भूमिकेत दिसली होती. मात्र, आता या मालिकेचं नवं पर्व येणार आहे. ज्यामध्ये शिवानी सोनार मोठ्या चिंधीची म्हणजेच सिंधुताईंची भूमिका साकारणार आहे. याचबरोबर या मालिकेचे शीर्षक बदलले असून याचे नाव आता ‘सिंधुताई माझी माई – चिंधी बनली सिंधू’ असं असणार आहे.
हे देखील वाचा – कॅन्सरमुळे डगमगले, २० किलो वजन घटलं; जीवघेण्या आजारावर अतुल परचुरेंची मात, नाटकामधून करत आहेत कमबॅक
कलर्स मराठीच्या ऑफिशिअल सोशल मीडिया अकाउंटवर याचा नवा प्रोमो नुकतंच समोर आला आहे. या प्रोमोमध्ये असं दाखवण्यात आलं की, आधी छोटी चिंधी जात्यावर दळण दळताना दिसून येत असून त्यानंतर मोठी चिंधी म्हणजे सिंधुताई दिसून आल्या आहेत. या सिंधुताईंच्या जीवनप्रवासातील सिंधू कश्या होत्या, हे मालिकेच्या नव्या पर्वात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. विशेष म्हणजे, या मालिकेच्या निमित्ताने शिवानी पुन्हा एकदा छोट्या पडदा गाजवण्यासाठी सज्ज झाली आहे. तिला या नव्या भूमिकेत पाहण्यासाठी चाहते आतुरलेले आहे.
हे देखील वाचा – Video : “माझं काम कपडे उतरवण्याचं…”, वादग्रस्त प्रकरणावर अखेर राज कुंद्राने सोडलं मौन, व्हिडीओ तुफान व्हायरल
एरव्ही अनेक दिवसांपासून मालिकाविश्वात सक्रिय नसलेली शिवानी सोशल मीडियावर मात्र चांगलीच सक्रिय आहे. ती तिचे अनेक फोटोज व रील्स नेहमी तिच्या चाहत्यांसह शेअर करते. त्याचबरोबर तिच्या फोटोशूट्सची सुद्धा नेहमीच जोरदार चर्चा होत असते.