shivani sonar and ambar ganpule wedding : मराठी सिनेविश्वात सध्या लगीनघाई सुरु असलेली पाहायला मिळत आहे. मराठी कलाकार एकापाठोपाठ लग्नबंधनात अडकताना दिसत आहेत. रेश्मा शिंदे, वैष्णवी कल्याणकर, किरण गायकवाड, हेमल इंगळे, कौमुदी वल्होकर या कलाकार मंडळींनी अगदी थाटामाटात लग्नसोहळा उरकला. यापाठोपाठ सिनेविश्वातील आणखी एक क्युट कपल लग्नबंधनात अडकणार असल्याचं समोर आलं आहे. ही जोडी म्हणजे अभिनेता अंबर गनपुळे आणि अभिनेत्री शिवानी सोनार. अंबर व शिवानी यांची लगीनघाई सुरु झाली असल्याचं पाहायला मिळत आहे. सोशल मीडियावर त्यांनी लग्नापुर्वीच्या विधींना सुरुवात झाली असल्याची झलक शेअर केली आहे. लग्नाआधीच्या विधीचे फोटो शिवानीने इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर केले आहेत.
शिवानी सोनारने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर स्वतःचा एक फोटो शेअर केला होता. या फोटोला कॅप्शन देत तिने असे लिहिलं होतं की, “नवरी होण्यास तयार”. या फोटोमध्ये शिवानीने ऑफ व्हाइट रंगाची साडी, नाकात नथ, कपाळावर टिकली लावून मराठमोळा लूक केला होता. यानंतर अभिनेत्रीने आणखी एक फोटो शेअर केला आहे. ज्यामध्ये जातं, पाटा-वरंवटा, खलबत्ता याची पूजा केलेली पाहायला मिळत आहे. शिवानीने शेअर केलेल्या याच फोटोवरुन लग्नाआधीच्या विधीला सुरुवात झाली असल्याचं कळतंय.
आणखी वाचा – दिस सरले! हेमंत ढोमे-क्षिती जोग यांच्या लग्नाचा जुना Unseen Video व्हायरल, म्हणाला, “आमचं प्रेम…”

गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर, ९ एप्रिल २०२४ला शिवानी सोनार आणि अंबर गणपुळेचा साखरपुडा सोहळा संपन्न झाला. त्यांच्या शाही साखरपुडा समारंभातील अनेक फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले. साखरपुड्यानंतर आता ही जोडी लग्नबंधनात अडकण्यास सज्ज झाली आहे. लग्नाआधी तिच्या केळवणाला सुरुवात झाली असल्याचंही समोर आलं. घरच्यांनी साजरं केलेलं केळवणचे फोटो शिवानीने सोशल मीडियाद्वारे शेअर केले होते. या केळवणासाठी शिवानीच्या घरच्यांनी चमचमीत पदार्थांचा बेत केल्याचे दिसून आलं. केळवणाच्या जेवणात मांसाहारी जेवणाचाही समावेश असल्याचे पाहायला मिळालं.
आणखी वाचा – “जर अभिनेत्री नसती तर?…”, चाहत्याचा जुई गडकरीला थेट प्रश्न, जुई उत्तर देत म्हणाली, “मोठ्या ब्रँडमध्ये…”

शिवानी व अंबरच्या साखरपुड्याचे फोटो अजूनही चर्चेत आहेत. अशातच काही दिवसांपूर्वी त्यांनी Bride To Be Party आणि Groom To Be Partyचे फोटो शेअर केले होते. आता अभिनेत्रीच्या लग्नापुर्वीच्या विधींचे फोटोही सोशल मीडियावर तूफान व्हायरल होत आहेत. आता अंबर व शिवानी लग्नबंधनात केव्हा अडकणार याकडे साऱ्यांच्या नजरा लागून राहिल्या आहेत.