मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय जोड्यांपैकी एक जोडी म्हणून अभिनेता हेमंत ढोमे आणि क्षिती जोग यांना ओळखले जाते. हेमंत व क्षिती यांनी २०१२ मध्ये एकमेकांबरोबर लग्नगाठ बांधली. मनोरंजनसृष्टीत काम करता करता ही जोडी एकमेकांच्या प्रेमात पडली आणि त्यांनी एकमेकांबरोबर लग्न करण्याचा निर्णय घेतला. आता त्यांच्या लग्नाला जवळपास १२ वर्षे पूर्ण झाली आहेत. हेमंत सध्या त्याच्या आगामी ‘फसक्लास दाभाडे’ या चित्रपटाची जोरदार चर्चा सुरु आहे आणि यानिमित्ताने हेमंत ढोमेही चर्चेत आहे. या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये तो व्यस्त आहे. हेमंत हा सोशल मीडियावर कायम सक्रीय असतो. सोशल मीडियावर तो आपळे फोटो व व्हिडीओ शेअर करत असतो. (Hemant Dhome and Kshitee Jog unseen wedding video)
अशातच हेमंतने नुकताच त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे एक खास व्हिडीओ शेअर केला आहे. ज्याची सर्वत्र चर्चा सुरू आहे. हा व्हिडीओ आहे हेमंत-क्षिती यांच्या लग्नाचा. हेमंतने त्याची पत्नी क्षिती जोगबरोबर लग्न लागतानाचे काही क्षण या व्हिडीओमधून शेअर केले आहेत. हेमंत-क्षिती यांच्या लग्नाला १२ वर्ष झाली आहेत आणि तरीही त्यांच्यातील प्रेम व मैत्री कायम टिकून असल्याचे मत हेमंतने अनेकदा मांडलं आहे. या खास व्हिडीओमधून त्याने लग्नातील जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे.
आणखी वाचा – ‘आई कुठे काय करते’ फेम अभिनेत्रीने घेतली ‘ही’ महागडी कार, भावुकही झाली अन्…; व्हिडीओ व्हायरल
या व्हिडीओखाली हेमंतने असं म्हटलं आहे की, “व्हिडिओ जुना आहे पण गाणं नवं आहे. बाकी ते आमचं प्रेम कसं आहे वगैरे तुम्हाला माहितीच आहे” अशी खास पोस्ट केली आहे आणि या व्हिडीओला अनेक कलाकारांनी व चाहत्यांनी लाईक्स व कमेंट्स करत चांगलाच प्रतिसाद दिला आहे. सिद्धार्थ चांदेकर, अमेय वाघ, सायली संजीव यांसारख्या अनेक कलाकारांनी या व्हिडीओवर लाईक्स व कमेंट्स करत चांगलाच प्रतिसाद दिला आहे. तसेच अनेक चाहत्यांनीही या व्हिडीओला “एक नंबर जोडी”, “खूप छान”, “माझी आवडती जोडी” अशा अनेक कमेंट्स करत या प्रतिसाद दिला आहे.
दरम्यान, क्षिती हेमंतपेक्षा ३ वर्षाने मोठी आहे. व्यावसायिक आयुष्यात तिची सुरुवात हेमंतच्या आधी झाली. १० डिसेंबर २०१२ मध्ये त्यांनी पुण्यामध्ये लग्न केले आणि खर्या अर्थाने संसाराला सुरुवात झाली. कलाक्षेत्र, आपापली कामं आणि घर या सगळ्याचा तोळ संभाळत हे दोघे त्यांचा संसार करत आहेत. लवकरच त्यांचा फसक्लास दाभाडे हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.