अभिनय क्षेत्रात ‘पुढचं पाऊल’ टाकताच यशस्वी झालेली सर्वांची लाडकी अभिनेत्री म्हणजे जुई गडकरी. ‘पुढचं पाऊल’ मालिकेद्वारे मनोरंबजन क्षेत्रात प्रवेश करताच जुईला प्रेक्षकांकडून प्रचंड प्रेम मिळाले. जुई ही गेली अनेक वर्ष टेलिव्हिजनचा लोकप्रिय चेहरा आहेच, पण अभिनयात उत्तम असणारी जुई शिक्षणातही हुशार होती आणि याबद्दल तिने स्वत:चा अनेकदा भाष्य केलं आहे. जुई गडकरीने आपलं पदवीपर्यंतच शिक्षण BMM मध्ये पूर्ण केलं आहे. Advertising या विषयात पदवी संपादन करत जुईने मुंबई विद्यापीठाचं सुवर्ण पदक मिळवलं आहे. (jui gadkari answered fan question)
अभिनयासह तिचा शिक्षणातील व्यासंग अधिक आहे. जुई २००९ मध्ये मुंबई विद्यापीठाची टॉपरही होती. यानंतर जुईने पदव्युत्तर पदवी Advertising And PR या विषयात संपादन केली आहे. त्यामुळे जुई जर अभिनेत्री नसती तर? तर ती नोकरीच्या क्षेत्रातही तितकीच यशस्वी झाली असती. असं म्हणायला हरकत नाही. जुई गडकरी सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. आपल्या आयुष्यातील प्रत्येक अपडेट्स, शूटिंगच्या सेटवरची धमाल, ‘ठरलं तर मग’ मालिकेचे प्रोमो ती नेहमी शेअर करते.

आणखी वाचा – दिस सरले! हेमंत ढोमे-क्षिती जोग यांच्या लग्नाचा जुना Unseen Video व्हायरल, म्हणाला, “आमचं प्रेम…”
अशातच २०२५ या नवीन वर्षाच्या सुरुवातीला तिने इन्स्टाग्रामवर ‘आस्क मी सेशन’ केलं होतं. यात तिला तिच्या चाहत्यांनी अनेक प्रश्न विचारळे होते. यावेळी एका चाहत्याने तिला “जुई गडकरी जर अभिनेत्री नसती तर कोण असती?” असा हटके प्रश्न विचारला होता. यावर जुईने चाहत्याला असं उत्तर दिल होतं की, “जर मी अभिनेत्री नसते तर आज कोणत्या तरी मोठ्या ब्रँडमध्ये ब्रँड-हेड किंवा ब्रँड-मॅनेजर या पदावर असते. जाहिरात आणि मार्केटिंगवर माझे खूप आणि खरे आहे”.
दरम्यान, ‘पुढचं पाऊल’ नंतर जुई अनेक मालिकांमध्ये दिसली होती. ‘माझिया प्रियाला प्रीत कळेना’, ‘वर्तुळ’, ‘सरस्वती’ या मालिकांमध्ये ती झळकली. ‘बिग बॉस मराठी’मध्येही जुई सहभागी झाली होती. सध्या ती ठरलं तर मग या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे आणि या मालिकेतील तिची भूमिका सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे