सोमवार, सप्टेंबर 7, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Video : शेफाली जरीवालाचा मृतदेह रुग्णालयात असताना इमारतीमध्ये कुत्र्यासह नवऱ्याचा फेरफटका, हातात पत्नीचा फोटो अन्…

Majja Webdeskby Majja Webdesk
जून 28, 2025 | 2:00 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Shefali Jariwala husband viral video

Video : शेफाली जरीवालाचा मृतदेह रुग्णालयात असताना इमारतीमध्ये कुत्र्यासह नवऱ्याचा फेरफटका, हातात पत्नीचा फोटो अन्...

सुप्रसिद्ध अभिनेत्री शेफाली जरीवालाच्या निधनानंतर कलाविश्वावर शोककळा पसरली आहे. अवघ्या ४२व्या वर्षी शेफालीने जगाचा निरोप घेतला. प्रथमदर्शनी तिचं हृदयविकाराच्या आजाराने निधन झालं असल्याची माहिती समोर आली. पण अद्यापही कुटुंबाकडून किंवा डॉक्टरांकडून कोणतीच अधिकृत माहिती हाती आलेली नाही. अशातच या संपूर्ण प्रकरणाची पोलिसही चौकशी करत आहेत. शेफालीच्या अचानक जाण्याने संपूर्ण कुटुंबालाही मोठा धक्का बसला आहे. आई संपूर्ण प्रकरण समजताच पूर्ण कोलमडून गेली आहे. दरम्यान शेफालीचा पती पराग त्यागीचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच चर्चेचा विषय ठरत आहे. (Shefali Jariwala husband viral video)

शवविच्छेदनासाठी शेफालीचा मृतदेह कूपर रुग्णालयात ठेवण्यात आला आहे. सध्या शवविच्छेदन सुरु असल्याची माहिती समोर आली आहे. आता शवविच्छेदनाच्या अहवालामधून नक्की काय समोर येणार? हे काही वेळात स्पष्ट होईलच. पण त्याचपूर्वी परागचा त्याच्या इमारतीच्या परिसरातील व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये पराग त्यांच्या पाळीव कुत्र्याला घेऊन दिसत आहे.

आणखी वाचा – “वेळ आली आहे…”, मृत्यूपूर्वी शेफाली जरीवालाने केलेली ‘ती’ पोस्ट चर्चेत, आयुष्याबाबत केलेलं भाष्य

View this post on Instagram

A post shared by Instant Bollywood Videos (@instantbollywoodvideos)

पराग त्यांच्या पाळीव कुत्र्याला घेऊन इमारतीच्या परिसरामध्ये फिरताना दिसला. यावेळी त्याच्या हातात शेफालीचा फोटोही होता. व्हिडीओमध्ये एक पोलिस व्हॅनही दिसत आहे. शेफालीचा मृतदेह रुग्णालयात असताना तो इमारतीच्या परिसरात अशाप्रकारे फिरणं अनेकांना चांगलंच खटकलं. यावेळी तो त्याच्याच विचारांमध्ये मग्न असल्याचंही पाहायला मिळालं. मात्र पत्नीचं निधन होऊनही पराग असा का फिरत आहे?, ती रुग्णालयात असताना हा इथे काय करत आहे? असे अनेक प्रश्न नेटकरी सोशल मीडियाच्या माध्यमातून विचारत आहेत.

आणखी वाचा – “तरुण दिसण्यासाठी उपचार घेत होती आणि…”, शेफाली जरीवालाच्या निधनानंतर डॉक्टरांचा धक्कादायक खुलासा, नक्की काय म्हणाले?

दरम्यान शवविच्छेदन सुरु असताना पराग पुन्हा कूपर रुग्णालयामध्ये पोहोचला आहे. तसेच कलाकारांनीही रुग्णालयामध्ये गर्दी केली आहे. हिंदुस्तानी भाऊही यावेळी कॅमेऱ्यासमोर रडताना दिसला. शेफाली आणि हिंदूस्तानी भाऊ यांच्यामध्ये बहीण-भावाचं नातं होतं. शेफालीच्या निधनानंतर त्यालाही दुःख अनावर झालं. तर कित्येक कलाकार मंडळींनी सोशल मीडियाद्वारे पोस्ट शेअर करत शेफालीला श्रद्धांजली वाहिली.

Tags: bollywood newsentertainment newsShefali Jariwala
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Suraj Chavan Baby
Entertainment

सूरज चव्हाण झाला बाबा, घरी आली गोड परी, लग्नाच्या वर्षभरातच दिली गुडन्यूज

सप्टेंबर 5, 2026 | 11:03 am
Leena Bhagwat Health Update
Entertainment

मराठी अभिनेत्रीचा आवाजाशी सामना, छोटीशी सर्जरीही झाली, हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आणि…

सप्टेंबर 2, 2026 | 11:20 am
Kapil Honrao Social Media Break
Entertainment

तुलना, प्रेशर अन्…; मराठी अभिनेत्याचा मोठा निर्णय, सोशल मीडियाला केला रामराम, म्हणाला, “शर्यतीपासून…”

सप्टेंबर 2, 2026 | 9:45 am
Aali Mothi Shahani Teaser
Entertainment

हृता दुर्गुळे आणि सारंग साठ्ये यांच्या ‘आली मोठी शहाणी’ चित्रपटाचा टीझर प्रदर्शित

सप्टेंबर 1, 2026 | 1:04 pm
Next Post
shefali jariwala hindustani bhau

"आता फोनमध्ये फक्त नाव असेल", शेफाली जरीवालाच्या मृत्यूनंतर हिंदुस्थानी भाऊही रडला, स्वतःला सावरत म्हणाला…

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.