बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानची लाडकी लेक सारा अली खानने हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये चांगलंच नाव कमावलं आहे. ‘केदारनाथ’ या चित्रपटातून तिने पदार्पण केले. चित्रपटातील तिच्या भूमिकेचे कौतुकही करण्यात आले. त्यानंतर तिने अनेक चित्रपटांमध्ये जबरदस्त भूमिका केल्या आहेत. सध्या ती ‘ए वतन मेरे वतन’ व ‘मर्डर मुबारक’ या चित्रपटांमुळे अधिक चर्चेत आहे. पण सध्या ती एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आली आहे. साराचा सध्या एक व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये तिच्या पोटावर भाजल्याच्या खुणा दिसत आहेत. साराचा हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर तिच्या चाहत्यांनी काळजी व्यक्त केली आहे तर काहींनी तिला ट्रोलही केले आहे. (Actress sara ali khan burn mark)
सदर व्हिडीओमध्ये सारा जीमच्या बाहेर दिसत आहे. तिच्या पोटावर भाजल्याच्या खुणा सर्वांनी पाहिल्या आणि तिला त्याबद्दल विचारले. त्यावर ती म्हणाली की “मला थोडं भाजलं”. तिचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताच नेटकऱ्यांनीही त्यावर अनेक प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका नेटकऱ्याने म्हंटले आहे की, “हे दाखवणं गरजेचं आहे का?” दुसऱ्या नेटकऱ्याने लिहिले आहे की, “भाजलं आहे तर ते दाखवण्याने ठीक होणार आहे का?”, पण काही नेटकऱ्यांनी काळजी दाखवत म्हणाले की, “लवकर बरी हो”.
काही दिवसांपूर्वी याबाबत तिने स्वतः खुलासा केला होता. सोशल मिडियावर व्हिडीओ शेअर करत म्हणाली की, “जेव्हा तुम्ही एकाच वेळी दोन चित्रपटांचे प्रमोशन करता तेव्हा अशा घटना घडणारच.प्रमोशनसाठीच बाहेर जात असताना माझ्यावर गरम कॉफी सांडली आणि मला भाजलं”.
दरम्यान सारा मोठ्या पडद्यावरील अभिनयानंतर आता ओटीटीवर अभिनय करताना दिसणार आहे. सध्या तिचा ‘ए वतन मेरे वतन’ या चित्रपटातून समोर येत आहे. या चित्रपटाच्या प्रोमोला खूप प्रसिद्धी मिळत आहे. या चित्रपटामध्ये सारा स्वतंत्र्यापूर्वीची गोष्ट दाखवण्यात आली आहे.तसेच नेटफ्लिक्सवरही ‘मर्डर मुबारक’ हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे.