सध्या सगळीकडे चर्चा आहे ते अभिनेत्रींच्या खास लुकची. या चर्चेत भर पडताना दिसते अभिनेत्री रुचिरा जाधवच्या हटके लूकची. माझ्या नवऱ्याची बायको, बिग बॉस अशा अनेक प्रोजेक्ट्स मधून रुचिरा प्रेक्षकांच्या भेटीला आली. आणि दिलखेचक अंदाजाने रुचिराने प्रेक्षकांचं मनोरंजन केलं.(Ruchira Jadhav New Song Video)
आता रुचिरा ” पौर्णिमेचा शुभ्र चंद्र” या नव्याकोऱ्या गाण्यातून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. सुरेश वाडकर यांच्या आवाजाने स्वरबद्ध झालेलं गाणं चांगलंच हिट ठरताना पाहायला मिळतंय. या गाण्यात रुचिरा सोबत अभिनेता आदित्य दुर्वे देखील पाहायला मिळतोय. या गाण्यातील रुचिराचा हॉट अंदाज चांगलाच चर्चेत ठरतोय. तसेच या गाण्यावर अनेक रील्स सुद्दा वायरल होताना दिसतायत.
प्रेमाची अनोखी व्याख्या मांडणाऱ्या या गाण्यात एक चित्रकार एका सुंदर स्त्रीचे चित्र काढतो. पण जेव्हा चित्रामधील लावण्यवती प्रत्यक्षात अवतरते तेव्हा नेमके काय घडते याचे सुंदर सादरीकरण दाखवण्यात आले आहे.
अनेक मालिका व चित्रपटांमधून नावलौकिक मिळवलेले रुचिरा जाधव व आदित्य दुर्वे या दोघांवर हे गाणे चित्रित केले आहे.
वाचा कशी झाली गाण्याची निर्मिती(Ruchira Jadhav New Song Video)
केदार जोशी आणि पूर्वा जोशी यांच्या सुमन एंटरटेनमेंट या निर्मिती संस्थेअंतर्गत चित्रित करण्यात आलेल्या या गाण्यात एखादा कलाकार त्याच्या कलाकृतीशी एकरूप होतो आणि त्यानंतर घडलेल्या घटना या उत्तमरित्या मांडण्यात आल्या आहेत.
सुनीता मुलकलवार लिखित या गीताला अभिजित जोशी यांनी संगीत दिले आहे तर, प्रख्यात गायक सुरेश वाडकर यांचा स्वरसाज या गीताला लाभला आहे. या गीताचे दिग्दर्शन दुर्गेश हरावडे तर, नृत्यदिग्दर्शन मीरा जोशी आणि तुषार बल्लाळ यांनी केले आहे. या सुमधुर गीताचे छायाचित्रण किआन चव्हाण यांनी केले आहे.(Ruchira Jadhav New Song Video)