शुक्रवार, जून 6, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“कलाकार इतरांना आनंद देतो पण…”, आयुष्यातील एकाकीपणावर प्राजक्ता माळीचा श्री श्री रविशंकर यांना प्रश्न, म्हणाली, “पुढे जाण्यासाठी…”

Saurabh Moreby Saurabh More
जानेवारी 27, 2024 | 10:07 am
in Entertainment
Reading Time: 2 mins read
google-news
Actress Prajakta Mali questions Sri Sri Ravi Shankar on loneliness in the life of an artist see the details

“कलाकार इतरांना आनंद देतो पण...”, आयुष्यातील एकाकीपणावर प्राजक्ता माळीचा श्री श्री रविशंकर यांना प्रश्न, म्हणाली, “पुढे जाण्यासाठी...”

एखादा कलाकार आपली कला इतरांसमोर सादर करून समोरच्याला आनंद देण्याचा प्रयत्न करत असतो. समोरच्याला आपली कला आवडणे व त्याने त्या कलेला योग्य ती दाद दिल्यामुळे कोणताही कलाकार संतुष्ट होतो. कलाकार हा त्याच्या कलाक्षेत्रात जितका आनंदी असतो, तितकाच तो त्याच्या वैयक्तिक आयुष्यात मात्र एकाकीचे जीवन जगत असतो आणि या एकाकी जीवनात तो त्याच्या कलेव्यतिरिक्त इतर गोष्टी करण्यात रमतो. या इतर गोष्टी म्हणजे वाचन करणे, चित्र काढणे, फिरणे आणि यासारखे बरेच काही.

काही कलाकार त्यांचं मन रिझवण्यासाठी कलेव्यतिरिक्त आध्यात्मिक मार्ग साधतात आणि यांपैकीच एक कलाकार म्हणजे अभिनेत्री प्राजक्ता माळी. प्राजक्ता माळी ही तिच्या बोल्ड आणि बिनधास्त अंदाजामुळे जितकी ओळखली जाते तितकीच ती आध्यात्मिकही आहे. प्राजक्ता ही तिच्या कलाक्षेत्राव्यतिरिक्त आध्यात्मिक क्षेत्रातही तितकीच कार्यरत असते. प्राजक्ताने काही दिवसांपूर्वी श्री श्री रविशंकर यांच्या प्रवचनात त्यांना “लग्न करणे जरूरी आहे का?” असा प्रश्न विचारला होता आणि तिच्या या प्रश्नाची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली होती. अशातच आता अभिनेत्रीने त्यांना पुन्हा एकदा एक प्रश्न विचारला आहे.

View this post on Instagram

A post shared by Prajaktta Mali (@prajakta_official)

आणखी वाचा – Video : सासरी भजन सुरू असलेलं पाहून मुग्धा वैशंपायनला राहवेना, अंदमानमध्ये असताना घराची ओढ अन्…; म्हणाली, “तिथे…”

प्राजक्ताने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे एक व्हिडीओ शेअर केला आहे, ज्यात ती श्री श्री रविशंकर यांना असा प्रश्न विचारते की, “कलाकार हा इतरांच्या आयुष्यात आनंद देत असतो, पण तो त्याच्या वैयक्तिक आयुष्यात मात्र एकटाच असतो. हे सगळ्यांच्या आयुष्यात असतं, पण एखाद्या कलाकाराच्या आयुष्यात हे एकाकीपण जरा अधिकच असतं. तर कलाकाराने समाजाप्रती, कुटुंबाप्रती आणि स्वत:च्या आयुष्यात पुढे जाण्यासाठी काय केलं पाहिजे?”. यावर उत्तर देत श्री श्री रवीशंकर असे म्हणतात की, “कलाकार हा नेहमीच चेहऱ्यावर खोटा आनंद घेऊन समाजात वावरत असतो. यामुळे कलाकार दुसऱ्यांना आनंदी ठेवण्याच्या नादात स्वत: आनंदी राहण्याचे विसरून जातो. कलाकार हा स्वभावाने खूपच भावुक असतो आणि भावना कधीच एकसारखी नसते. एखाद्या कलेत नऊ रस, नऊ भाव असतात. त्यांना आपण कलेद्वारा मांडत असतो पण आपण जोपर्यंत भावातीत होत नाही तोपर्यंत आपल्या आयुष्यात स्थिरता येत नाही. त्यामुळे कलाकाराच्या आयुष्यात एकाकीपण असते.”

आणखी वाचा – “नाट्यगृह स्वच्छ ठेवणे…”, नाट्यगृहाच्या अस्वच्छतेबाबत प्रिया बापटचा संताप, म्हणाली, “ही साधी गोष्ट…”

यापुढे श्री श्री रविशंकर यांनी योगाचे व अध्यात्मिक ज्ञानाचे एखाद्या कलाकाराच्या आयुष्यातील स्थान किती महत्त्वाचे आहे हे सांगत त्यांनी आध्यात्मिकतेचे महत्त्वदेखील पटवून दिले. दरम्यान, प्राजक्ता माळीला या खास प्रवाचनासाठी कलाकार म्हणून बोलवण्यात आले असल्याचा आनंद तिने यावेळी व्यक्त केला आहे. तसेच या व्हिडीओची सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चा सुरू आहे.          

Tags: marathi actressmarathi entertainmentmarathi entertainment newsMarathi newsprajakta maliप्राजक्ता माळीमराठी अभिनेत्रीमराठी बातमीमराठी मनोरंजन
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Aamir khan talk about his girlfriend
Entertainment

“प्रेम लपवणं म्हणजे तिचा अपमान”, ६०व्या वर्षी तिसऱ्यांदा प्रेम, गर्लफ्रेंडबाबत बोलला आमिर खान, नातं जगजाहिर केलं कारण…

जून 6, 2025 | 7:00 pm
Anushka Sharma And Virat Kohli
Entertainment

IPLमध्ये विराट कोहलीचा विजय पण अनुष्का शर्मा झाली श्रीमंत, तब्बल इतकी आहे संपत्ती, एकूण कमाई…

जून 6, 2025 | 6:00 pm
muzammil Ibrahim on pooja bhatt
Entertainment

“कलाकार कुत्र्यांसारखे असतात, शिवीगाळी करुन…”, पूजा भट्टवर सुप्रसिद्ध अभिनेत्याचे गंभीर आरोप, घाणेरडी वागणूक दिली अन्…

जून 6, 2025 | 5:00 pm
Who Is Hina Khan Husband
Entertainment

हिना खानचा नवरा नक्की कोण आहे आणि काय करतो?, अभिनेत्रीला कॅन्सर झाला तेव्हा घेत होता काळजी, कमाई आहे तब्बल…

जून 6, 2025 | 4:00 pm
Next Post
Music director ilaiyaraaja daughter and singer bhavatharini passes away due to cancer at age of 47

प्रसिद्ध संगीत दिग्दर्शक इलैयाराजा यांची कन्या व पार्श्वगायिका भवतारिणी यांचे निधन, वयाच्या अवघ्या ४७व्या वर्षी घेतला अखेरचा निरोप, कर्करोगाशी झुंज ठरली अपयशी

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.