मंगळवार, सप्टेंबर 1, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

प्रसिद्ध संगीत दिग्दर्शक इलैयाराजा यांची कन्या व पार्श्वगायिका भवतारिणी यांचे निधन, वयाच्या अवघ्या ४७व्या वर्षी घेतला अखेरचा निरोप, कर्करोगाशी झुंज ठरली अपयशी

Saurabh Moreby Saurabh More
जानेवारी 26, 2024 | 1:31 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Music director ilaiyaraaja daughter and singer bhavatharini passes away due to cancer at age of 47

प्रसिद्ध संगीत दिग्दर्शक इलैयाराजा यांची कन्या व पार्श्वगायिका भवतारिणी यांचे निधन, वयाच्या अवघ्या ४७व्या वर्षी घेतला अखेरचा निरोप, कर्करोगाशी झुंज ठरली अपयशी

संगीत विश्वातून नुकतीच एक दु:खद बातमी समोर येत आहे. प्रसिद्ध व लोकप्रिय संगीत दिग्दर्शक इलैयाराजा यांची कन्या व पार्श्वगायिका, भवतारिणी यांचे निधन झाले आहे. भवतारिणी यांचे काल (२५ जानेवारी) रोजी कर्करोगाने निधन झाले. काही मीडिया रिपोर्ट्सनुसार, भवतारिणी यकृताच्या कर्करोगावर उपचार घेण्यासाठी श्रीलंकेला गेल्या होत्या. मात्र, काल सायंकाळी पाचच्या सुमारास भवतारिणी यांची प्राणज्योत मालवली. 

भवतारिणी या ४७ वर्षांच्या होत्या. भवतारिणी या संगीतकार इलैयाराजा यांच्या कन्या तर कार्तिक राजा आणि युवान शंकर राजा यांची बहीण होत्या. भवतारिणी यांनी रासैया (१९९५) मधून गायिका म्हणून या क्षेत्रात पदार्पण केले होते. भारती (२००१) चित्रपटातील मायल पोला पोन्नू ओन्नू या गाण्यासाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्कारदेखील मिळाला होता. इलैयाराजा यांच्या कन्या भवतारिणी या पार्श्वगायिका आणि संगीतकार होत्या.  

Shell Shocked! Isaignani Ilayaraja 's daughter and Singer #Bhavatharini (47) passed away in Srilanka this evening! #OmShanti pic.twitter.com/vcw1cevCPB

— Sreedhar Pillai (@sri50) January 25, 2024

आणखी वाचा – “नाट्यगृह स्वच्छ ठेवणे…”, नाट्यगृहाच्या अस्वच्छतेबाबत प्रिया बापटचा संताप, म्हणाली, “ही साधी गोष्ट…”

तमिळमध्ये यशस्वी कारकीर्द केल्यानंतर, भवतारिणी यांनी ‘अवुना’ चित्रपटाद्वारे तेलुगु चित्रपट क्षेत्रातदेखील पदार्पण केले. शिल्पा शेट्टी, अभिषेक बच्चन आणि सलमान खान यांच्या भूमिका असलेल्या ‘फिर मिलेंगे’ या चित्रपटासाठी त्यांनी संगीत दिले होते. भवतारिणी यांनी रासैय्या नावाच्या सिनेमातून पार्श्वगायन सुरु केलं. तसंच इलैयाराजा आणि कार्तिकराजा तसंच युवान शंकर राजा यांच्यासाठीही त्यांनी गाणी म्हटली. संगीतकार देवा आणि सिरपी यांच्यासाठीही गाणी गायली होती.

आणखी वाचा – “कलाकार इतरांना आनंद देतो पण…”, आयुष्यातील एकाकीपणावर प्राजक्ता माळीचा श्री श्री रविशंकर यांना प्रश्न, म्हणाली, “पुढे जाण्यासाठी…”

‘मायनिधी’ हा भवतारिणी यांचा संगीत लाभलेला शेवटचा अल्बम ठरला. त्यांनी कधालुक्कु मरियाधई, भारती, अजागी, फ्रेंड्स, पा, मनकथा आणि अनगेन यांसारख्या तमिळ चित्रपटांसाठीदेखील गायन केलं आहे. दरम्यान, भवतारिणी यांच्या जाण्याने संगीत विश्वात एक पोळकी निर्माण झाली असून त्यांच्या निधनावर अनेक चाहते व रसिक श्रोत्यांनी शोक व्यक्त केला आहे.

Tags: भवतारिणीइलैयाराजाbhavatharinideath newsIlaiyaraajasinger
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Aali Mothi Shahani Teaser
Entertainment

हृता दुर्गुळे आणि सारंग साठ्ये यांच्या ‘आली मोठी शहाणी’ चित्रपटाचा टीझर प्रदर्शित

सप्टेंबर 1, 2026 | 1:04 pm
Paach Footacha Bachchan
Entertainment

कीर्तन विश्व उलगडणाऱ्या ‘पाच फुटाच्या बच्चन’चा टीजर समोर, दिसणार तगड्या कलाकारांची फौज

सप्टेंबर 1, 2026 | 11:20 am
 Badshah and Isha Rikhi announced Divorce
Entertainment

पाच महिन्यानंतच संसार मोडला, सुप्रसिद्ध गायकाचा घटस्फोट, लग्नापूर्वी चार वर्ष केलं एकमेकांना डेट अन्…

सप्टेंबर 1, 2026 | 7:58 am
Rajat Bedi Marathi Movie
Entertainment

बॉलिवूडनंतर रजत बेदींची मराठी सिनेमात एन्ट्री; ‘बंधू’ चित्रपटातून नवी इनिंग

ऑगस्ट 31, 2026 | 4:24 pm
Next Post
Spruha Joshi

"कधीच मूल नको आहे असं…", आई होण्याबद्दल स्पृहा जोशी स्पष्टच बोलली, म्हणाली, "बाळ झाल्यानंतर…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.