एखाद्या सेटवर अभिनेत्रींची सगळ्यात आवडती कोणती गोष्ट असेल तर तो त्यांचा मेकअप. अनेक वेळा अभिनेत्रींच्या नैसर्गिक सौंदर्यात आणखी भर टाकण्याचं काम हे मेकअपच्या मदतीने केलं जात. अगदी हलका मेकअप ही अभिनेत्रींना सुंदर दिसण्यासाठी पुरेसा असतो. एका अभिनेत्रीच्या साध्या मेकअप लुकवरून प्रेक्षकांना अभिनेत्री मृणाल दुसानिसची आठवण आल्याचं पाहायला मिळालं.(Nava Gadi Nav Rajya Actress)
नवा गडी नवं राज्य मालिकेतील आनंदीचा म्हणजेच अभिनेत्री पल्लवी पाटीलचा एक फोटो सध्या वायरल होतोय .या फोटो मध्ये पल्लवी अगदी साध्या आणि निरागस अंदाजात दिसत आहे. पल्लवीचा हा फोटो पाहून प्रेक्षकांना अभिनेत्री मृणाल दुसानिसची आठवण आल्याची पाहायला मिळतंय. पल्लवीच्या या फोटो वर एका चाहत्याने ” निखळ, निर्भेळ,शुद्ध आणि शांत चेहरा….मृणाल दुसानीसची आठवण झाली…. कुठलाही जास्त मेक अप लागणारच नाही कारण नैसर्गिकच बोलका चेहरा आणि डोळे…. क्या बात है आनंदी……म्हणजे खरं तर पल्लवी पण आमच्यासाठी आनंदीच ” अशी कमेंट केली आहे.
तर अनेकांनी पल्लवीच्या या लूकचं आणि मालिकेतील आनंदी या ती साकारत असलेल्या भूमिकेचं कौतुक केलं आहे. नवा गडी नवं राज्य या मालिकेत कश्यप सोबत आनंदीच्या भूमिकेत अभिनेत्री पल्लवी तर त्याच्या मुलीच्या भूमिकेत बालकलाकार साईशा भोईर देखील पाहायला मिळते. शिवाय मालिकेत लोकप्रिय अभिनेत्री अनिता दाते देखील रमा या प्रमुख भूमिकेतून प्रेक्षकांचं मनोरंजन करते. या मालिकेला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद देखील पाहायला मिळतोय.(Nava Gadi Nav Rajya Actress)