कलाकाराच्या आयुष्यात सगळ्यात महत्वाचा भाग कोणता असेल तर तो त्याच्या प्रेक्षक. प्रेक्षकांना मनोरंजन करणं हे प्रत्येक कलाकार आपण कर्तव्य समजतो. परीक्षक सुद्दा आपल्या आवडत्या कलाकारावर असा काही जीव लावतात आणि कलाकाराच्या मनात कायमच घर करून जातात. एखाद्या कलाकाराच्या जाण्याने भावुक झालेले चाहते आपण पाहतो पण एका सच्चा चाहत्याच्या जाण्याने भावुक झालेला कलाकार फार कमी वेळा पाहायला मिळतो.(Aadesh Bandekar Fan Moment)
मागील काही वर्षांपासून भाऊजी बनून घराघरात पोहचलेले आदेश बांदेकर आपल्याला माहिती आहेत. आदेश बांदेकर यांचा महाराष्ट्र भरात मोठा चाहता वर्ग आहे. चाहत्यांच्या या यादीत सांगली येतील एका १०० वर्षांच्या आजीं बद्दलचा एक व्हिडिओ आदेश बांदेकर यांनी पोस्ट केलाय.
सांगली मधील या आजी मागील काही वर्षांपासून होम मिनिस्टर हा कार्यक्रम पाहायच्या आणि टीव्ही मध्ये आदेश बांदेकर यांना पाहून नमस्कार करायच्या. आदेश बांदेकर यांना पाहत त्या गाणं म्हणायच्या कारण त्यांना असा भास व्हायचा कि आदेश बांदेकर स्वतः ते गाणं ऐकत आहेत. त्यांनी आदेश यांना भेटण्याची व्यक्त केली. ही गोष्ट आदेश बांदेकर यांच्या पर्यंत पोहचताच त्यांनी आजींची भेट घेऊन त्यांची इच्छा पूर्ण देखील केली.(Aadesh Bandekar Fan Moment)
कालांतराने जीव लावणाऱ्या या मायबाप प्रेक्षकाला भेटण्याची संधी पुन्हा एकदा आदेश बांदेकर यांना मिळाली पण यावेळी त्यांना धक्का बसला सांगली येतील वृत्तपत्रात या आजींच्या निधनाची बातमी आदेश यांना वाचायला मिळाली आणि ते भावुक झाले.
व्हिडिओ पोस्ट करत आदेश यांनी कॅप्शन मध्ये ‘उरल्या सगळ्या त्या आठवणी …. 🙏🙏🙏नातं रक्तापलीकडचं 🙏🙏’ असं लिहिलं आहे.