अभिनेत्री नम्रता संभेराव तिच्या विनोदी शैलीमुळे प्रेक्षकांच्या आवडत्या अभिनेत्रींपैकी एक आहे. अभिनयाची सहजता, विनोदाच अचूक टायमिंग यामुळे तिने प्रेक्षकांच्या मनात तिचं असं हक्कच स्थान निर्माण केलं आहे. नम्रताला खरी लोकप्रियता मिळाली ती म्हणजे महाराष्ट्राची हास्यजत्रा या विनोदी कार्यक्रमामुळे. महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यमामुळे जरी आता ती चर्चेत आली असली तरी त्या आधीच तीने ‘कॉमेडी एक्सप्रेस’ या शोमधून अभिनयाची छाप पाडायला सुरुवात केली. सध्या महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमातील लॉली या विनोदी पत्राने तिची ओळख तिला मिळवून दिली आहे. (Namrata Sambherao Special Ukhana)
नुकतीच नम्रताने एका कार्यक्रमाला हजेरी लावली होती. तिथे तिने खास उखाणा घेत जमलेल्या प्रेक्षकांचं चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं. नम्रताने भर कार्यक्रमात घेतलेला उखाणा तिने तिच्या लग्नात घेतला होता. नम्रताने ठाण्यातील एका मंगळागौरीच्या कार्यक्रमाला हजेरी लावली होती. तिथे तिने तिच्या लॉली या पात्राचे काही संवादही बोलून दाखवत प्रेक्षांना खुश केलं. शिवाय कार्यक्रमात तिने तिच्या लग्नात घेतलेला भलामोठा उखाणा देखील म्हणून दाखवला. कार्यक्रमात बोलताना ती म्हणाली, ‘मी माझ्या लग्नात एक खास उखाणा घेतला होता. माझे पती योगेश संभेराव इथे आलेले आहेत त्यानिमित्ताने मी तो उखाणा आज घेतेय.”
आणखी वाचा – ‘सुंदरा मनामध्ये भरली’ फेम अक्षया नाईकची रंगभूमीवर दमदार एन्ट्री, नव्या लूकने वेधलं लक्ष
“उखाणा थोडा मोठा आहे. झाड झुंबराचं, फुल उंबराचं, दूध गाईचं, फुल जाईचं, लेक कुणाची आई वडिलांची, सून कुणाची सासू सासऱ्यांची, राणी कुणाची भरताराची, भरतार भरतार केलं नाही, कधी रुसवा घेतला नाही, रूसवा घेऊ कशासाठी, नेसायला दिली पिवळी धाटी, पिवळ्या धाटीला उभा दोरा, रुखवत गेला पाटलांच्या घरा, पाटील म्हणतो नाव घे बाई, नाव काय फुकाचं, हळदी कुकाचं, हळदी कुकानं भरलं ताट, योगेशराव बसले पूजेला समया लावते तीनशे साठ’.”
नम्रताने या कार्यक्रमाला पतीसोबत हजेरी लावली होती. नम्रताने घेतलेल्या उखाण्याचं साऱ्यांनी कौतुक केलं. दरम्यान कार्यक्रमात उपस्थित असलेल्या सर्वांनी नम्रताच तोंडभरून कौतुक केलं.