बुधवार, एप्रिल 15, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Video : वाढदिवशीही गौतमीला बहिणीकडून त्रास, मृण्मयीच्या शुभेच्छांनी अभिनेत्रीला आला राग, म्हणाली, “मला न्याय हवाय!”

Saurabh Moreby Saurabh More
जानेवारी 31, 2024 | 4:19 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Actress mrunmayee Deshpande shared funny video with wishing gautami on her birthday

वाढदिवशीही गौतमीला बहिणीकडून त्रास, मृण्मयीच्या शुभेच्छांनी अभिनेत्रीला आला राग, म्हणाली, “मला न्याय हवाय!”

झी मराठी वाहिनीवरील ‘माझा होशील ना’ या लोकप्रिय मालिकेतून अवघ्या महाराष्ट्रात लोकप्रिय झालेली अभिनेत्री म्हणजे गौतमी देशपांडे. या मालिकेतील गौतमीची भूमिका प्रेक्षकांनी चांगलीच उचलून धरली. अशातच आज गौतमीचा वाढदिवस आहे. यानिमित्ताने तिला चाहत्यांकडून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या जात आहे. चाहते मंडळी अनेक प्रकारे तिच्याव शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत. अशातच गौतमीच्या आयुष्यातील एका खास व्यक्तीने तिला वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत.

गौतमीच्या आयुष्यातील ही खास व्यक्ती म्हणजे तिची बहीण व अभिनेत्री मृण्मयी देशपांडे. ‘देशपांडे सिस्टर्स’मधील अनोखा बॉण्ड हा चाहत्यांना कायमच पाहायला मिळाला आहे. दोघींचे अनेक व्हिडीओला चाहत्यांनी लाईक्स व कमेंट्सद्वारे प्रतिसादही दिला आहे. अशातच मृण्मयीने लाडक्या बहीणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी अक्षरश: तिची झोपमोड केली आहे. हो, ही खरं आहे.

आणखी वाचा – गालावर किस करण्याचा खुलासा केल्याने मन्नारा चोप्रा मुनव्वर फारुकीवर भडकली, आश्चर्यचकित होत म्हणाली, “त्याने जाहीर माफी मागावी नाहीतर…”

View this post on Instagram

A post shared by Gautami Deshpande (@gautamideshpandeofficial)

मृण्मयीने शेअर केलेल्या या व्हिडीओमध्ये गाढ झोपलेल्या गौतमीला मृण्मयी प्रचंड त्रास देत असल्याचं पाहायला मिळत आहे. बहिणीची झोपमोड करताना मृण्मयी Happy Birthday बोलून तिला शुभेच्छाही देत आहे. परंतु, एवढा त्रास देऊनही गौतमी शेवटपर्यंत झोपलेलीच दिसत आहे. वाढदिवशीही मोठ्या बहिणीचा त्रास सहन करावा लागला असल्यामुळे अनेकांनी या व्हिडीओखाली कमेंट्समध्ये गौतमीबद्दल सहानुभूती दाखवली आहे.

आणखी वाचा – गौतमी देशपांडेच्या वाढदिवसानिमित्त नवऱ्याची खास पोस्ट, रोमॅंटिक फोटो शेअर केला अन्…; म्हणाला, “माझ्या आयुष्यातील..”

या व्हिडीओवर गौतमीनेदेखील तिची प्रतिक्रिया दिली आहे. गौतमीने “यासाठी मला न्याय हवा आहे! घरातल्या धाकट्या भावडांनी कृपया कमेंट्समध्ये आपली मतं मांडा. शुभेच्छांसाठी धन्यवाद, पण यासाठी धन्यवाद नाही” असं म्हटलं आहे. दरम्यान, सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल होत असून या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी कमेंट्समध्ये गौतमीला वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच मृण्मयीच्या अशा वागण्यामुळे गौतमीबद्दल सहानुभूतीदेखील व्यक्त केली आहे.  

Tags: entertainment newsgautami deshpandemarathi actressmarathi entertainmentMarathi Entertainment Newsमृण्मयी देशपांडेmrunmayee deshpandeगौतमी देशपांडेमनोरंजन बातमीमराठी अभिनेत्रीमराठी मनोरंजन
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Salman Khan Skipped Asha Bhosle Funeral
Entertainment

Asha Bhosle Funeral : मुंबईत असूनही आशा भोसलेंच्या अंत्यसंस्काराला शाहरुख आणि सलमान खान का आले नाहीत?, कारण समोर…

एप्रिल 15, 2026 | 9:47 am
Bapya Marathi Movie Songs
Entertainment

‘कारट्या’ची धूम, ‘बाप्या’च्या युथफुल रॅप साँगचा सोशल मीडियावर धुमाकूळ, सिनेमॅटिक शूट लक्षवेधी

एप्रिल 14, 2026 | 4:46 pm
Alia Bhatt Has Opened Up About Motherhood
Entertainment

आलिया भट्टच्या तीन वर्षीय मुलीला वाटते अपयशाची भीती, सद्गुरुंना विचारलं, “मी चांगली आई आहे का?”

एप्रिल 14, 2026 | 2:24 pm
Abhishek Bachchan 0n IPL
Entertainment

“ते माझ्या बजेटच्या बाहेर होतं”, अभिषेक बच्चनने IPL मध्ये कोणताही संघ न खरेदी करण्यामागचे सांगितलं कारण, म्हणाला, “खूप महाग…”

एप्रिल 14, 2026 | 1:10 pm
Next Post
Bigg boss 17 winner munawar faruqui victory event fans faces fir for drone see the details

‘नाद केला पण...’, डोंगरीमध्ये गर्दी जमवणं मुनव्वर फारुकीला भोवलं, ‘त्या’ व्हायरल व्हिडीओमुळे पोलिसांची कारवाई

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.