प्रेक्षक व चाहत्यांना मनोरंजनसृष्टीत वावरणाऱ्या कलाकार मंडळींची प्रत्येक गोष्ट जाणून घेण्यात अधिक रस असतो. त्यातील काही कलाकार हे उघडपणे आपल्या खासगी आयुष्याबाबत बोलताना दिसतात, तर काही सोशल मीडियाच्या माध्यमातून. कलाकार मंडळींचे नातं, अफेअर, लग्न, रिलेशनशिप हे काही कोणापासून लपून राहिलेले नाही. मराठी मनोरंजन विश्वातही असे अनेक कलाकार आहे, जे लवकरच लग्नबंधनात अडकणार आहेत. कलाकारांची ही यादी दिवसेंदिवस वाढत असताना आता आणखी एका नावाचा यात समावेश झाला आहे. ती म्हणजे अभिनेत्री मीरा जोशी. (Meera Joshi Wedding)
मीराने तिच्या अभिनय व नृत्याच्या जोरावर कलाक्षेत्रात स्वतःचं स्थान बळकट केलं आहे. मालिका, चित्रपट व रिअॅलिटी शोजमधून प्रसिद्धीच्या झोतात आलेली ही अभिनेत्री सध्या अनेक कारणांनी चर्चेत राहत आहे. काही दिवसांपूर्वी तिने एक फोटोशूट करत तिच्या नात्याबाबत खुलासा केला होता. पण आता एक नवा फोटो शेअर करत मीराने तिच्या बॉयफ्रेंडचा चेहरा सर्वांसमोर आणला आहे. त्याचबरोबर तिने तिच्या लग्नाची तारीख जाहीर करत चाहत्यांना आणखी एक आनंदाची बातमी दिली आहे.
मीराने काही दिवसांपुर्वी सोशल मीडियावर आपण प्रेमात पडल्याचं सांगितलं आहे. त्यावेळी तिने तिच्या बॉयफ्रेंडबरोबरचा पाठमोरा उभा असलेला फोटो शेअर केला होता. मात्र, या फोटोत मीराने त्याचा चेहरा दाखवला नसल्याने तो कोण आहे, याची उत्सुकता सगळ्यांनाच लागली होती. आता त्याचा चेहरा समोर आणला आहे. मीरा लवकरच नृत्य दिग्दर्शक नेरुल वारुळेसह विवाहबंधनात अडकणार आहे.
आणखी वाचा – शाही थाट, पारंपरिक लूक अन्…; अक्षय देवधरची पहिली मंगळागौर थाटामाटात पार, फोटो व्हायरल
मीराने आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर तिच्या बॉयफ्रेंडसोबतचा एक फोटो शेअर केला आहे. त्या फोटोमध्ये लिहिताना तिने आपल्या लग्नाची तारीखदेखील जाहीर केली आहे. मीरा व नेरुल येत्या ५ सप्टेंबर रोजी विवाहनबंधनात अडकणार असून हे दोघे नेमकं कुठे लग्न करणार, कश्यारीतीने करणार, हे मात्र समोर आलेले नाही. मीराच्या बॉयफ्रेंडबद्दल बोलायचे झाल्यास, नेरुल वारुळे हा नृत्य दिग्दर्शक आहे. त्याने अनेक कार्यक्रमांचे नृत्य दिग्दर्शन केलं असून स्टार प्रवाहावरील ‘मी होणार सुपरस्टार’ या डान्स रिऍलिटी शोचा विजेता राहिला आहे.
अभिनेत्री मीरा जोशीने काही दिवसांपूर्वी स्वतःचे घर घेतले असून त्याचे फोटोस व्हायरल झाले आहे. मध्यंतरी तिचा कार अपघात झाला होता, ज्याचा तिला मोठा धक्का बसला होता. (Meera Joshi Wedding)