बॉलिवूडमधील बहिणींच्या जोड्यांमध्ये एक जोडी नेहमीच चर्चेत राहिली ती म्हणजे प्रियांका चोप्रा व परिणीती चोप्रा. नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे ही बहिणींची जोडी लक्ष वेधून घेत असते. अशातच त्यांची चुलत बहीण मीरा चोप्राही देखील सिनेविश्वात सक्रिय आहे. बऱ्याच चित्रपटांमधून मीरा प्रेक्षकांच्या भेटीला आली. सिनेइंडस्ट्रीत काम करताना बहिणींकडून कोणताही पाठिंबा मिळाला नाही, असं मीराने केलेलं वक्तव्य सध्या चर्चेत आलं आहे. (Meera Chopra On Priyanka and Parineeti Chopra)
सिद्धार्थ कन्ननला दिलेल्या मुलाखतीत मीराने तिला मिळालेल्या म्हणाली, “सुरुवातीपासूनच आमच्यात इतकी जवळीक नव्हती की आमचं नातं मैत्रिणींसारखं वाटू शकेल. मात्र एकाच कुटुंबातील तीन-चार मुली जेव्हा इंडस्ट्रीत काम करतात तेव्हा त्या एकमेकांना मदत करतात. मात्र असं काही माझ्याबाबतीत घडलं नाही. मी कधीही मदत मागितली नाही आणि त्यांच्याकडून कधीही मदत मिळाली नाही. मी मदत मागणारी नाही आणि त्यांनी कधीच मदत केली नाही” असं मीरा म्हणाली.
यापुढे मीरा म्हणाली, “आमचे कुटुंबीय एकमेकांशी बोलत नाहीत, त्यामुळे मला त्यांच्याशी बोलून माझ्या कुटुंबाला दुखवायचं नाही. मी अजूनही प्रियांकाच्या कुटुंबाच्या खूप जवळ आहे. मला मधु काकींना चित्रपट दाखवायचा आहे. ते सर्वजण माझ्यासाठी खूप खूश आहेत. प्रियांका आणि माझं नातं खूप चांगलं होत, पण आता थोडा बदल झाला आहे. ती खूप मोठ्या मनाची आहे,” असंही मीरा म्हणाली.
लहानपणी त्यांचं सर्व कुटुंबीय एकाच घरात राहायचे. “पण जेव्हा एखादी व्यक्ती खूप यशस्वी होते, तेव्हा इतरांना फार महत्त्व देत नाहीत, कमी लेखू लागतात,” असं मीरा म्हणाली. मीराचं प्रियांकाच्या कुटुंबाशी चांगलं नातं आहे. प्रियांका व निक जोनासच्या लग्नालाही तिने हजेरी लावली होती. मात्र परिणीती चोप्रा व त्यांच्या कुटुंबियांशी ते बोलत नाहीत.