लहानपणी पडद्यावर कलाकार पाहून अनेकदा आपली ही इच्छा होते कि एकदा तरी चित्रपट, मालिकांमध्ये का करावं आणि काहींचं ते स्वप्न पूर्ण देखील झालं. बालकलाकारांच्या यादीतील असच एक आघाडीचं नाव म्हणजे बालकलाकार मायरा वैकुल. माझी तुझी रेशीमगाठ नंतर मायराची नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. कलर्स टीव्ही वरील नीरजा एक नई पहचान या मालिकेत मायरा दिसणार आहे. यासंदर्भातील एक व्हिडिओ मायराने पोस्ट केला आहे.(Myra Vaikul Hindi Serial)

मायरा सोबतच या मालिकेत अभिनेत्री स्नेहा वाघ देखील दिसणार आहे. अनेक हिंदी मालिकांमध्ये काम करून प्रेक्षकांचं मनोरंजन केल्यानंतर आता स्नेहा कलर्स वाहिनीवरील नीरजा या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तर छोट्या पडद्यावर आता मायरा आणि स्नेहाची जोडी प्रेक्षकांना आवडणार का हे पाहणं रंजक ठरणार आहे. मायरा ने यापूर्वी साकारलेली माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेत साकारलेली परी प्रेक्षकांना चांगलीच आवडली होती.
हे देखील वाचा – साऊंड ऑपरेटर ते देवमाणूस आणि ‘चौकात’ लागणारे यशाचे बॅनर जाणून घ्या अभिनेता किरण गायकवाडची स्ट्रगल स्टोरी.
अभिनेत्री स्नेहा वाघ ही मराठी बिग बॉस मध्ये देखील पाहायला मिळाली होती. तर मायची परी ही व्यक्तिरेखा प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस उतरली होती. त्यानंतर मायरा आता चला हवा येऊ द्या मध्ये आणि गाजर भक्तीचा या झी टॉकीज वरील गजर भक्तीचा या मालिकेत देखील पाहायला मिळते.(Myra Vaikul Hindi Serial)