“मला कधी कधी अशा माणसांची कीव येते…”मानसी नाईकची पोस्ट पुन्हा चर्चेत

Mansi Naik Post Viral
Mansi Naik Post Viral

आयुष्यात सोबत असणारी माणसं कधी चांगला तर कधी वाईट अनुभव देऊन जातात. माणसांबाबत आलेला हा अनुभव शेअर केला आहे अभिनेत्री मानसी नाईक हिने. मानसी आणि तिच्या नवऱ्या सोबतच्या नात्यावर आतापर्यंत तिने बऱ्याच वेळा भाष्य केलं आहे. मानसीने तिच्या फेसबुक अकाउंट वरून शेअर केलेल्या पोस्ट मध्ये म्हणल आहे.(Mansi Naik Post Viral)

” ज्यांच्याबद्दल अतोनात विश्वास असतो ती माणसं कधीकधी इतकी धक्कादायक वागतात की त्या धक्क्याने आपण कोसळून जाऊ असं वाटू लागतं जवळच्या माणसांनी केलेले विश्वासघात फार जिव्हारी लागणारे असतात त्यामुळे लौकिक अर्थाने आपलं फारसं नुकसान झालेलं नसलं तरी भावनिक पातळीवर कधीही न भरून निघणारी हानी झालेली असते माणसांवरचा विश्वास उडू लागतो अशाने फार हट्ट करावासा वाटत नाही मग कशाहीसाठी आणि कोणाहीसाठी अर्थात या पासिंग फेजेस असतात…

हे देखील वाचा – आणि खांद्यावरच्या माकडाने अशोक सराफ यांना सणसणीत टपली मारली

माणसाचं असत्य रूप आपल्याला माहिती असूनही आपण ते माहिती नसल्यासारखं दाखवणं आणि त्याच्या वागण्यातून दिसणारे विरोधाभास अनुभवणं ही गमतीदार गोष्ट असते खोटंनाटं उलटंपालटं बोलून वागून आपण समोरच्याला फसवू शकतो असं काही लोकांना वाटत असतं त्यांच्या वर्तनातल्या विसंगती आपल्या लक्षात आलेल्या असतात मग तर त्यांची कीव येते.

(Mansi Naik Post Viral)

अक्षरशः का वागत असतील माणसं अशी स्वतःसह इतरांना का फसवत असतील ज्यांच्याशी अगदी पटतच नाही त्यांच्यासोबत सुद्धा वाद घालून किंवा स्पष्टीकरणं देऊन आपण आपलं मानसिक स्वास्थ्य घालवू नये असं मला वाटतं कटुता आणून खळखळ आवाज करत नाती संपवू नयेत झाडावरून जितक्या सहजतेने फूल निसटतं तितकी सहजता आपल्यात असावी एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यातून बाजूला होताना…”

मानसीने शेअर केलेला अनुभव तिच्या आणि परदीपच्या नात्याबद्दल आहे का असा प्रश्न हे प्रेक्षकांनी विचारला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like
Sulochana Latkar Real Name
Read More

हे होत सुलोचना याचं खर नावं वाचा काय आहे सुलोचना दीदी यांच्या खऱ्या नावाचा किस्सा

   सुलोचना यांचे मूळ नाव रंगू दिवाण. कोल्हापूरजवळच्या एका खेड्यात त्यांचा जन्म झाला आणि कोल्हापूर काही  चित्रपटात नगण्य…
Saie Tamhankar Liplock
Read More

प्रिया बापट नंतर सईचा “लेस्बियन लिपलॉक” सीन होतोय वायरल सईच्या आगामी क्राईमबेस सिरीजचा टिझर लाँच

अभिनेत्री चर्चेत केवळ लूक्समुळे नसतात तर काही तर त्यांच्या अभिनयातील काही हटके सीन्समुळे सुद्दा असतात. सध्या अभिनेत्री सई…
(Sayli Sanjeev Ruturaj Gaikwad)
Read More

” मी तुम्हा दोघांसाठी…..” ऋतुराजच्या लग्नाचा फोटो पोस्ट करत सायली म्हणते…

लोकप्रिय लोकांच्या यादीत खूप कमी नाव अशी मिळतात ज्यांच्या बद्दल कोणत्याही अफवा पसरवल्या जात नाहीत. पण अनेक कलाकारांना…
Namrata Sambherao Father
Read More

“बाहुलीच हवी मला द्यामज आणुनी” नम्रताची वडिलांसाठी भावुक पोस्ट

वडील म्हणजे प्रत्येकाच्या आयुष्यातील एक महत्वाची बाजू. आपल्या आयुष्याला शिस्त देण्याचं काम केलं जात ते वडिलांकडून. आज महाराष्ट्राची…
Rinku Rajguru Sairat
Read More

फक्त १० मिनिटांची ऑडिशन आणि महाराष्ट्राला मिळाली “आर्ची”….

एखादा कलाकार अनेक चित्रपटानंतर लोकप्रियतेच्या शिखरावर पोहचतो पण काही कलाकारांना एक चित्रपट मेहनतीची संधी देतो आणि त्या संधीच…