भाग्य दिले तू मला मालिका ही सध्या टीआरपीच्या शर्यतीत अव्वल स्थानावर आहे. मालिकेत आलेल्या रंजक वळणांमुळे ही मालिका सध्या लोकप्रियता मिळवतेय. अशातच मालिकेच्या नव्या प्रोमोने प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं आहे. नुकत्याच समोर आलेल्या प्रोमोमध्ये असे पाहायला मिळणार आहे की, वैदेही राज घरी असतात, तेव्हा वैदेही राज जवळ येण्याचा प्रयत्न करते, मात्र राज वैदेहीला काही रिस्पॉन्स करत नाही. (Bhagya Dile Tu Mala Promo)
मात्र वैदेही राजचला घट्ट मिठी मारते तेव्हा राजचा राग अनावर होतो आणि राज वैदेहीला जोरात ढकलून देतो. वैदेही खाली पडते आणि तेव्हा तिच्या डोक्याला टेबल लागत, मात्र राज काही वैदेहीकडे पाहत नाही आणि तेथून निघून जातो. त्यावेळी वैदेहीवर पाठी मागून कोणीतरी वार करत आणि वैदेहीच्या डोक्यातून रक्त येत.
पहा कसा अडकणार राज वैदेहीवरील हल्ला प्रकरणात (Bhagya Dile Tu Mala Promo)
राज इकडे हॉटेलवर येतो तेव्हा माहेरच्या चहाच्या नावाला कापडाने बांधून ठेवलेलं असत ते पाहून राजचा राज आणखी वाढतो. तो रत्नमाला यांना बोलतो, नाव का लपवलं आहे, काही झालं तर मी भोगायला तयार आहे, यावर राजला रत्नमाला आणि बच्चू मामा समजवतात. त्यानंतर राजला जेव्हा काळात कि वैदेहीला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं आहे तेव्हा राज हॉस्पिटलमध्ये येतो, (Bhagya Dile Tu Mala Promo)
हे देखील वाचा – “मला कधी कधी अशा माणसांची कीव येते…”मानसी नाईकची पोस्ट पुन्हा चर्चेत
तेव्हा सानिया राज ला बोलते, वैदेहीला तू ढकलला आहे हे मला माहित आहे, मी त्या वेळी तिथेच होते, मी याची साक्षिदार आहे, हे ऐकून राजला घाम फुटतो. आता सानिया राजला ब्लॅकमेल करून त्याचा वापर करणार का हे पाहणं मालिकेत रंजक ठरेल.
