सोमवार, ऑगस्ट 31, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“त्याचे १० चित्रपट फ्लॉप आणि…”, कंगना रणौतने शाहरुख खानबरोबरच केली स्वतःची तुलना, म्हणाली, “संपूर्ण जगात त्याच्यासारखा…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
मार्च 28, 2024 | 4:48 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Kangana Ranaut On Her Flop Cinema

"त्याचे १० चित्रपट फ्लॉप आणि...", कंगना रणौतने शाहरुख खानबरोबरच केली स्वतःची तुलना, म्हणाली, "संपूर्ण जगात त्याच्यासारखा..."

चित्रपटांमुळे कंगना रणौत बरेचदा चर्चेत असते. मात्र गेली काही वर्ष कंगना रणौतचे चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालण्यात अयशस्वी ठरले आहेत. ‘धाकड’पासून ‘थलायवी’, ‘तेजस’ आणि ‘चंद्रमुखी’पर्यंत असा एकही चित्रपट आलेला नाही ज्या चित्रपटाने चांगली कमाई केली असेल. या चित्रपटांच्या फ्लॉपवर कंगना रणौतने प्रतिक्रिया दिली आहे. कंगनाने स्वत:ची तुलना शाहरुख खानशी केली आणि म्हटले आहे की, “मोठे सुपरस्टारदेखील त्यांच्या यशापेक्षा जास्त अपयशी ठरतात”. कंगना राणौत लवकरच ‘इमर्जन्सी’ चित्रपटामध्ये दिसणार आहे, ज्यामध्ये तिने अभिनय व दिग्दर्शनही केले आहे. हा चित्रपट या वर्षी २०२४ मध्ये प्रदर्शित होणार आहे. (Kangana Ranaut On Her Flop Cinema)

कंगना रणौतला या चित्रपटाकडून खूप अपेक्षा आहेत. अभिनेत्रीने ‘टाइम्स नाऊ समिट’मध्ये बॉक्स ऑफिसवर तिच्या चित्रपटांच्या सतत फ्लॉप जाण्याबद्दल भाष्य केलं आहे. इतकंच नव्हेतर अभिनेत्रीने शेवटच्या सुपरस्टार्सपैकी एक असं स्वतःचं वर्णन केलं आहे. कंगना म्हणाली, “संपूर्ण जगात त्याच्यासारखा कोणी नाही. शाहरुख खानचे १० चित्रपट चालले नाहीत, मग ‘पठाण’ने काम केले. माझा एकही चित्रपट ७-८ वर्षे चालला नाही, नंतर ‘क्वीन’ धावली, मग ३-४ वर्षांनी ‘मणिकर्णिका’ धावली. आता पुढचा ‘इमर्जन्सी’ रिलीज होतोय, तुम्हाला माहीत नाही, पण हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर कमाल करेल”.

आणखी वाचा – सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्रीची चिमुकली लेक आतापासूनच करत आहे स्वामी समर्थांची भक्ती, शेअर केला व्हिडीओ, म्हणाली, “स्वामी आबा…”

त्यानंतर कंगनाने स्वत:ची आणि शाहरुख खानची या पिढीतील शेवटचे सुपरस्टार अशी ओळख करुन दिली. अभिनेत्री म्हणाली, “आम्ही नावाजलेले चेहरे आहोत आणि देवाच्या कृपेने आम्हाला खूप मागणी आहे. पण केवळ कलेच्या क्षेत्रातच मग्न न राहता मला स्वतःला खऱ्या जगाशी जोडायचे आहे”.

आणखी वाचा – आदिती राव हैदरीने सुप्रसिद्ध अभिनेत्याबरोबर दुसऱ्यांदा थाटला संसार, पहिल्या घटस्फोटानंतर लग्नाचा निर्णय, विवाहाबाबत सत्य समोर

कंगना रणौत अभिनयशिवाय आता राजकारणातही उतरली आहे. भाजपने त्यांना हिमाचल प्रदेशातील मंडी मतदारसंघातून तिकीट देऊन उमेदवारी दिली आहे. भाजपने रविवारी २४ मार्च रोजी आपल्या उमेदवारांची पाचवी यादी जाहीर केली होती, ज्यामध्ये कंगनाचेही नाव होते. कंगना सुरुवातीपासूनच भाजप व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची समर्थक आहे.

Tags: bollywood actressentertainmentkangana ranautKangana Ranaut On Her Flop Cinema
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Heavy Weight Lifting
Entertainment

कोणत्या प्रकारच्या व्यायामामुळे हृदयविकाराचा धोका वाढतो? जाणून घ्या आणि व्हा सावध

ऑगस्ट 29, 2026 | 10:14 am
Telugu actor GV Narayana Rao Death
Entertainment

ज्येष्ठ तेलुगू अभिनेते वयाच्या ७३ व्या वर्षी काळाच्या पडद्याआड, चिरंजीवींनी वाहिली श्रद्धांजली

ऑगस्ट 28, 2026 | 10:35 am
Kapuskonda Movie
Entertainment

‘कापूसकोंडा’मुळे सचिन पिळगावकर, मधुराणी गोखले पुन्हा एकत्र, २३ ऑक्टोबरला सिनेमागृहात

ऑगस्ट 28, 2026 | 10:02 am
Bandhu Marathi Movie
Entertainment

राम-लक्ष्मणाच्या अतूट बंधाची आठवण करून देणारा ‘बंधू’, उपेंद्र लिमये आणि जितेंद्र जोशी पहिल्यांदा एकत्र

ऑगस्ट 27, 2026 | 3:07 pm
Next Post
raveena tondon on akshay kumar

अक्षय कुमारबरोबर साखरपुडा मोडल्यानंतर सुप्रसिद्ध अभिनेत्रीची झाली होती वाईट अवस्था, आत्महत्येचाही प्रयत्न, म्हणालेली, "आमच्या दोघांमध्ये…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.