बॉलीवूडचे अनेक कलाकार असे आहेत ज्यांच्यामध्ये काही ना काही नाते आहे. बहीण-भाऊ, आई–मुलगा, बहिणी-बहिणी अशी अनेक नाती असलेले कलाकार पाहायला मिळतात. त्यामधील एक बहीणींची जोडी म्हणजे काजोल व रानी मुखर्जी. ९०च्या दशकामध्ये दोघींनीही मनोरंजन क्षेत्रामध्ये आपल्या करिअरची सुरुवात केली. दोन्ही नायिका आता बॉलिवूडमधील दिग्गज अभिनेत्री आहेत. पण जेव्हा त्या माध्यमांसमोर येत तेव्हा मात्र दोघींचेही वागणे थोडे बदलल्यासारखे दिसत असे. (rani mukharji and kajol )
याबरोबरच चुलत बहिणी असलेल्या काजोल व रानीमध्ये मतभेद असल्याचेही अनेकदा समोर आले आहे. अनेकदा दोघींच्या नात्यातील भांडणाचे किस्सेही ऐकायला मिळाले आहेत. त्या दोघी अनेक वर्षांपासून एकमेकींशी संवादही साधत नव्हत्या. पण दोघींमध्ये नक्की काय झालं होतं हे आपण आता जाणून घेऊया.
मिळालेल्या माहितीनुसार दोघींमध्ये या क्षेत्रात येण्यापूर्वीच मतभेद असल्याचे समजले आहे. लहानपणापासूनच त्या एकमेकींपासून दूर राहणे पसंत करत असत. पण जसजश्या मोठ्या झाल्या तसे मात्र त्यांच्यातील मतभेद अजून वाढले. त्यांच्या वादाची चर्चा मनोरंजन क्षेत्रामध्येही होऊ लागली.
१९९८ साली आलेल्या ‘कुछ कुछ होता है’ या चित्रपटामध्ये काजोल व रानी एकत्र काम करताना दिसल्या होत्या. त्यांच्याबरोबर शाहरुख खान मुख्य भूमिकेमध्ये पाहायला मिळाला होता. या चित्रपटादरम्यानही दोघींचे संबंध तितकेसे चांगले नव्हते. माहितीनुसार काजोलला रानी करत असलेला म्हणजे टिनाची भूमिका करायची होती. पण तिने त्यामध्ये अंजलीची भूमिका केली. टिनाची भूमिका मिळावी यासाठी दिग्दर्शक करण जोहरबरोबर तिने वादही घातले. पण करणने ही भूमिका रानीच करेल असे सांगितले. पण दोघींचं भांडण इथेच थांबले नाही तर ते अजूनच वाढत गेले.
२०१२ साली रानी मुखर्जीचा पती दिग्दर्शक आदित्य चोप्रा व काजोलचा पती अभिनेता अजय देवगण या दोघांचाही ‘जब तक है जान’ व ‘सन ऑफ सरदार’ हे चित्रपट एकाच दिवशी प्रदर्शित होणार होते. हे दोन्ही चित्रपट एकाच दिवशी प्रदर्शित झाल्याने पुन्हा एकदा वादाची ठिणगी पडली.
पण दोघींमध्ये कितीही वाद असले तरीही दुर्गा पूजेच्या वेळी त्या एकत्र दिसून येतात. त्यावेळी मात्र दोघीमध्ये कोणतेही वाद असलेले पाहायला मिळत नाहीत.