अनेक स्वप्न उरी बाळगून घर सोडलेला एखादा व्यक्ती आपली स्वप्न पूर्ण करण्यासाठी दिवसरात्र मेहनत करत असतो.अशा मेहनती व्यक्तींच्या यादीत काही स्वप्न बाळगून आलेल्या व्यक्तींमध्ये एक कलाकार असा आहे ज्याचं एक स्वप्न नुकतंच पूर्ण झालं आहे असं म्हणायला हरकत नाही. मालिका विश्वात अल्पावधीत गाजलेली मालिका म्हणजे भाग्य दिले तू मला या मालिकेतील साकारातमक पात्रासोबतच नकारात्मक पात्र देखील चांगलीच प्रसिद्ध झाली आहेत.(Jahnavi Killekar Ashok Saraf)
कलर्स मराठी वरील या मालिकेत राज कावेरीच्या भूमिकेत असणारे अभिनेता विवेक सांगळे आणि अभिनेत्री तन्वी मुंडले यांच्या पात्रांना अनुभवी अभिनेत्री निवेदिता सराफ यांच्या अनुभवाची जोड मिळाली आहे तर. मालिकेतील नकारात्मक पात्र साकारणारी खलनायिका म्हणजेच अभिनेत्री जान्हवी किल्लेकर साकारत असलेली सानियाची भूमिका ही पसंत करत आहेत.
====
हे देखील वाचा- संकर्षण कऱ्हाडेचं सकाळी ८.३० वाजता जेवण्यामागचं गुपित अखेर उलगडलं
====
भाग्य दिले तू मला या मालिके आधी जान्हवी श्री स्वामी समर्थ या मालिकेत दिसली होती. अनेक कलाकारांपैकीच एक साम्य असलेलं जान्हवीचं स्वप्न पूर्ण झालेलं सध्या दिसत आहे. आपल्या पैकी बऱ्याच जणांचं अशोक सराफ यांच्या सारख्या महान अभिनेत्याला भेटण्याचं स्वप्न पूर्ण झालं तर होणार आनंद गगनात न सामावणारा असेल. आता जान्हवीचं हे स्वप्न नुकतंच पूर्ण झालेलं दिसत आहे. अशोक सराफ आणि निवेदिता सराफ यांच्या सोबतच एक फोटो पोस्ट करत जान्हवी ने ‘बास..आता आयुष्यात मला दुसरं काही नको’ असं कॅप्शन दिलं तर तिने या साठी निवेदिता सराफ यांचे आभार देखील मानले आहेत.(Jahnavi Killekar Ashok Saraf)

जान्हवीच्या या फोटो आणि कॅप्शन वरून तिने पाहिलेल्या स्वप्नांपैकी हे एक स्वप्न पूर्ण झालं असं म्हणायला काही हरकत नाहीये. मराठी चित्रपटाच्या इतिहासातील सुवर्ण अक्षरात लिहिला जावा असा अभिनय करणारे अभिनेते अशोक सराफ यांना भेटण्याची इच्छा नसलेला व्यक्ती या महाराष्ट्रात तरी सापडणार नाही. केवळ सामान्य माणूसच नाही तर सिनेमा सृष्टीतील अनेक कलाकारांना ही अशोक सराफ यांना भेटण्याचा मोह आवरत नाही. त्यांना भेटून त्यांच्या मिळणारी प्रेरणा अनेक कलाकारांना पुढील वाटचाली साठी एक प्रेरणा देत असणार एवढं नक्की.