‘ये रिश्ता क्या कहलाता है’, ‘कसोटी जिंदगी की २’ या लोकप्रिय मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे हिना खान. हिंदी टीव्हीसृष्टीत हिनाने तिची वेगळी ओळख निर्माण केली. अभिनयाबरोबरचं सोशल मीडियाच्या माध्यमातून ती नेहमीच चाहत्यांच्या संपर्कात राहिली. सोशल मीडियावर अभिनेत्रीचा खूप मोठा चाहतावर्ग आहे. अभिनेत्री हिना खानबाबत एक धक्का देणारी बातमी समोर आली आहे. अभिनेत्रीची अचानक तब्येत बिघडली असल्याने तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याबाबतच माहिती स्वतःच अभिनेत्रीने चाहत्यांसह शेअर केली आहे. (Hina Khan Health Update)
हिनाने इन्स्टाग्राम अकाउंटवरुन खूप ताप आल्यामुळे तिला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आल्याचं सांगितलं. याचबरोबर चाहत्यांना हेल्थ अपडेट देत हिना म्हणाली की, ती लवकरच बरी होईल. हिनाने इन्स्टाग्राम अकाउंटवरुन दोन फोटो शेअर केले आहेत. यातील एका फोटोमध्ये हिना हॉस्पिटलच्या बेडवर बसलेली दिसत आहे. या फोटोवर कॅप्शन देत तिने ‘लाइफ अपडेट चौथा दिवस’ असं म्हटलं आहे.
दुसऱ्या फोटोमध्ये हिनाने थर्मामीटरचा फोटो शेअर केला आहे. ज्यामध्ये तिच्या शरीराचे तापमान १०२ असल्याचं दिसत आहे. थर्मामीटरचा फोटो शेअर करत त्यावर कॅप्शन देत तिने म्हटलं की, “मला खूप ताप आला आहे. माझ्या शेवटच्या चार रात्री खूप वाईट गेल्या. हा ताप कमी होत नाही आहे. सतत १०२, १०३ वर माझ्या शरीराचं तापमान राहतंय. त्यामुळे आता शरीरात ऊर्जा राहिलेली नाही”. हिनाने पुढे असेही लिहिले आहे की, “ज्यांना माझी काळजी आहे त्यांना कळवा की, मी लवकरच परत येईन”.
हिना खानला ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ या मालिकेमुळे प्रसिद्धी मिळाली. या मालिकेनंतर हिना खान ‘बिग बॉस’मध्ये झळकली. हिनाला ‘बिग बॉस’मधूनही खूप प्रसिद्धी मिळाली. ‘बिग बॉस’नंतर हिना ‘नागिन’ मालिकेतही दिसली होती. हिनाने विक्रम भट्टच्या ‘हॅक्ड’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं.