शनिवार, एप्रिल 18, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“आमच्याकडे अ‍ॅडव्हान्स द्यायला पैसे नव्हते तेव्हा…”, ‘झिम्मा २’मधील कलाकारांच्या मानधनाबाबत क्षिती जोगचा खुलासा, म्हणाली, “सर्व पणाला लावून…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
डिसेंबर 28, 2023 | 6:26 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Kshiti Jog Shared Incident

"आमच्याकडे अ‍ॅडव्हान्स द्यायला पैसे नव्हते तेव्हा…", 'झिम्मा २'मधील कलाकारांच्या मानधनाबाबत क्षिती जोगचा खुलासा, म्हणाली, "सर्व पणाला लावून…"

हेमंत ढोमे दिग्दर्शित ‘झिम्मा २’ हा चित्रपट तब्बल पाचव्या आठवड्यातही बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई करताना दिसत आहे. बिग बजेट व हिंदी चित्रपटांच्या गर्दीतही हा चित्रपट आपलं स्थान टिकवून आहे. २४ नोव्हेंबर रोजी हा सिनेमा प्रदर्शित झाला तेव्हापासून या चित्रपटाची सर्वत्र चर्चा सुरु आहे. चित्रपटाच्या कथानकामुळे व कलाकारांमुळे हा चित्रपट एका उंचीवर येऊन पोहोचला आहे. शिवाय प्रेक्षकांचा प्रतिसादही या चित्रपटाला मिळाल्याने हे शक्य झालं आहे. (Kshitee Jog Shared Incident)

‘झिम्मा २’ चित्रपटाचा ट्रेलर समोर आला त्या दिवसापासून चित्रपटातील एका कलाकाराचीचं विशेष चर्चा रंगली ती अभिनेत्री म्हणजे निर्मिती सावंत. तर अभिनेत्री क्षिती जोग हिने चित्रपटात दुहेरी भूमिका साकारली. या चित्रपटात क्षितीने अभिनेत्री व निर्माती अशा दोन्ही बाजू उत्तमरीत्या सांभाळल्या. क्षितीचं मराठी चित्रपटाबरोबरच हिंदी चित्रपटामुळेही कौतुक झालं आहे. या चित्रपटात तगड्या, लोकप्रिय कलाकारांची फौज एकत्र आली. चित्रपटात सुहास जोशी, क्षिती जोग, सुचित्रा बांदेकर, सिद्धार्थ चांदेकर, सायली संजीव, निर्मिती सावंत, रिंकू राजगुरू, शिवानी सुर्वे यांच्या भूमिका लक्षवेधी ठरल्या. निर्मिती सावंत यांच्या भूमिकेने तर अक्षरशः धुमाकूळ घातलेला पाहायला मिळाला.

आणखी वाचा – दिग्दर्शक साजिद खानचं निधन झाली असल्याची रंगली चर्चा, बातमी ऐकताच स्वतःच केला खुलासा, म्हणाला, “मी अजूनही जिवंत आणि…”

‘झिम्मा २’च्या अनेक आठवणी, किस्से, यंदाचं वर्ष यावर एकूणच ‘झिम्मा २’च्या कलाकारांनी एका मुलाखतीदरम्यान भाष्य केलं. ‘इट्स मज्जा’च्या ‘राउंड टेबल’ या सेगमेंटमध्ये ‘झिम्मा २’ चित्रपटाचा दिग्दर्शक व कलाकार मंडळींनी हजेरी लावली होती. दिग्दर्शक हेमंत ढोमे, अभिनेता सिद्धार्थ चांदेकर अभिनेत्री निर्मिती सावंत व क्षिती जोग हे कलाकार उपस्थित होते. यावेळी बोलताना क्षिती जोग हिने एक किस्सा सांगितला.

क्षिती म्हणाली, “‘झिम्मा २’च्या वेळी हा चित्रपट प्रदर्शित करण्यासाठी आमच्याकडे टीम होती. पण ‘झिम्मा’च्या वेळी असं काही नव्हतं. तेव्हा आम्ही सर्व पणाला लावून कलाकाराचं मानधन दिलं होतं. त्यावेळी सगळ्यांनी मला फोन करुन घाई कशाला केलीस असं सांगितलं. निर्मिती मावशीने मला फोन करुन, आता कुठे पाठवलेस पैसे, आता तर कोव्हीडमधून बाहेर आलो आहोत. ‘झिम्मा’च्या वेळेला आमच्याकडे अ‍ॅडव्हान्स द्यायला पैसे नव्हते” असं ती म्हणाली.

आणखी वाचा – १०३ ताप, ढसाढसा रडलो अन्…; एका फोननंतर परभणीहून संकर्षण कऱ्हाडेच्या वडिलांनी लेकासाठी आणलं जेवण, म्हणाला, “ताकद नाही आणि…”

यापुढे बोलताना क्षिती म्हणाली, “‘झिम्मा २’च्या वेळी ऍडव्हान्सची रक्कम जवळ होती. त्यामुळे मला खूप आनंद झाला होता की, माझ्याजवळ पैसे आहेत. असं म्हणून मी सर्वांना साइनिंग अमाउंट म्हणून चेक दिले. त्यावर सगळे म्हणाले, आता कशाला पैसे दिले. त्याच्यापुढे आठवड्याभराने निर्मिती मावशीने पाहिलं की चेक आहे पण चेकवर सहीचं केली नाही आहे. त्यांनतर जवळपास पंधरा एक दिवसांनी सायलीनेही सारखंच सांगितलं. आज चेक देणारच या आनंदात मी सही करायलाच विसरले”. असे अनेक किस्से त्यांनी या मुलाखतीदरम्यान सांगितले.

Tags: jhimma 2 producerkshiti jogkshiti jog incidentkshiti jog jhimma 2marathi actressmarathi movie
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Bigg Boss Marathi 6 Controversy
Entertainment

स्वयंपाक घरात उंदीर, टॉवेल, रेझर शेअर केले आणि…; ‘बिग बॉस मराठी ६’मधून बाहेर येताच स्पर्धकाने दाखवली परिस्थिती, म्हणाली, “स्किन इन्फेक्शन…”

एप्रिल 18, 2026 | 2:00 pm
Siddharth Venugopal actor death news
Entertainment

सुप्रसिद्ध साऊथ अभिनेत्याचे कॅन्सरने निधन, वयाच्या ४१व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, सिनेसृष्टीला धक्का

एप्रिल 18, 2026 | 1:28 pm
Akshaya Tritiya 2026
Lifestyle

अक्षय तृतीया 2026 च्या लक्ष्मीपूजनासाठी घराची तयारी कशी कराल?, दरवाजे, खिडक्या, आरसे…

एप्रिल 18, 2026 | 12:16 pm
how sleep can impact heart health
Lifestyle

झोपेच्या कमतरतेमुळे डायबिटीस, हृदयविकार, लठ्ठपणा, मानसिक समस्यांचा धोका वाढतो, जाणून घ्या यावर उपाय…

एप्रिल 18, 2026 | 11:50 am
Next Post
marathi actress suruchi adarkar shared news video of her her wedding see the glipmses of actress marriage

"मैत्री झाली, प्रेम झालं आता…", सुरुची अडारकरचा नवऱ्यासाठी हटके उखाणा, व्हिडीओमध्ये दिसली लग्नाची संपूर्ण झलक

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.