टीव्ही अभिनेत्री हिना खान सध्या तिच्या आयुष्यातील सर्वात कठीण टप्प्यातून जात आहे. या वर्षी जूनमध्ये तिने चाहत्यांना ब्रेस्ट कॅन्सरने ग्रस्त असल्याची वाईट बातमी दिली होती. अभिनेत्रीला तिसऱ्या स्टेजचा हा आजार झाला आहे. दरम्यान, हिना ब्रेस्ट कॅन्सरवर उपचार घेत असून आजाराबद्दल ती वेळोवेळी सोशल मीडियावरुन चाहत्यांना अपडेट देत असते. हिना त्या आजारावर व्यवस्थित उपचार घेत असून ती स्वत:ला कायमच आनंदीत ठेवण्याचा प्रयत्न करते. अभिनेत्री परिस्थितीसमोर धैर्याने लढताना दिसत आहे. अशातच तिने नुकताच एक व्हिडीओ शेअर केला आहे, ज्यामुळे चाहते तिच्यावर कौतुकाचा वर्षाव करीत आहेत. (Hina Khan Cancer News)
काही तासांपूर्वीच हिनाने इन्स्टाग्रामवर नववधूच्या लूकमध्ये रॅम्पवॉक करताना दिसली. रॅम्पवॉक करतानाचा अभिनेत्रीने व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. यामुळे चाहते तिच्यावर कौतुकाचा वर्षाव करीत आहेत. शिवाय तिच्या धाडसाचही कौतुक केले जात आहे. शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये अभिनेत्री हिना नववधूच्या अंदाजात आनंदाने, आत्मविश्वासाने आणि उत्साहाने चालताना दिसत आहे. शिवाय अभिनेत्रीने व्हिडिओ शेअर करताना खास सकारात्मक कॅप्शन देखील लिहिलं आहे.

या व्हिडीओखाली तिने असं म्हटलं आहे की, “मला माझे वडील नेहमी म्हणायचे की, तू माझी एक खंबीर व सक्षम मुलगी आहेस. केव्हाच रडायचं नाहीस. येणाऱ्या समस्यांबद्दल आणि अडचणींबद्दल केव्हाच तक्रार करु नकोस. स्वत:च्या जीवनावर तू नियंत्रण ठेव, खंबीर उभी राहा आणि त्याला सामोरे जा. म्हणून मी केव्हाच येणाऱ्या अडचणींचा जास्त विचार करत नाही. जितकं आपल्या प्रयत्नात आहे, त्या गोष्टीवर माझं लक्ष आहे. बाकी सर्व देवावर सोडलं आहे. तो कायमच आपली प्रार्थनाही ऐकतो आणि प्रयत्नही पाहतोच. त्यामुळे हिना नेहमी पुढे चालत राहा, केव्हाच थांबू नको, हे सतत मी स्वत:ला सांगत आले आहे”.
आणखी वाचा – Bigg Boss Marathi च्या घरात रंगला अनोखा खेळ, प्राणी ओळखताना सूरजची झाली दमछाक, भन्नाट व्हिडीओ पाहिलात का?
दरम्यान, हिना खानने इन्स्टाग्राम स्टोरीवर स्वतःचाही एक फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये फक्त तिचा हात आणि हॉस्पिटलचा बेड आणि रुम दिसत आहे. म्हणजेच हिनावर उपचार सुरू आहेत. ती किमोथेरपीसाठी रुग्णालयात आहे. तिने चाहत्यांना प्रार्थना करण्याची विनंतीही केली आहे. हिनाने सांगितले होते की तिची पाचवी केमोथेरपी सुरू आहे आणि अजून तीन बाकी आहेत. जर सर्व काही ठीक झाले तर ती या रोगाचा पराभव करेल.