Bigg Boss Marathi 5 : ‘बिग बॉस मराठी’च्या नवीन पर्वाला सुरुवात होऊन आता जवळपास ५० दिवस पूर्ण झाले आहेत. त्यामुळे दिवसागणिक या खेळाची रंजकता वाढत चालली आहे. घरात आपले स्थान शेवटपर्यंत टिकवून ठेवण्यासाठी स्पर्धक आपल्या परीने पूर्णतः प्रयत्न करताना दिसून येत आहेत आणि या स्पर्धकांची एकमेकांमधली स्पर्धा आणखी वाढावी यासाठी ‘बिग बॉस’देखील त्यांना अनेक नवनवीन टास्क देत आहेत. अशातच मंगळवारच्या भागात घरात बीबी करन्सीसाठी स्पर्धकांना एक आगळावेगळा टास्क देण्यात आला. बीबी करन्सी मिळवण्यासाठी मोठी कसरत करावी लागते. (Bigg Boss Marathi 5 New Promo)
या करन्सीमधून सगळे स्पर्धक अन्नधान्य, लक्झरी प्रॉडक्ट विकत घेतात. या टास्कमध्ये ‘बिग बॉस’ ज्याप्रमाणे जोड्या सांगतील त्यानुसार एका सदस्याने अभिनय करायचा आहे, तर दुसऱ्या सदस्याने कोणता प्राणी आहे हे समोरच्या सदस्याच्या अभिनयावरून ओळखून त्यानंतर पळत जाऊन हे प्राणी अॅक्टिव्हिटी रुममधून शोधून आणायचे आहेत. अशातच एक नवीन प्रोमो आला आहे, ज्यात सूरज व अंकिताची मजामस्ती पाहायला मिळत आहे. कलर्स मराठीच्या सोशल मीडिया अकाउंटद्वारे शेअर करण्यात आलेल्या या नवीन प्रोमोमध्ये अंकिता सूरजला अभिनय ओळखून प्राणी ओळखायला सांगते.
यासाठी ती डोक्यावर शिंगे दाखवते, पुढे तोंडावर शिंग असल्याचे दाखवते. यावरुन सूरजही तो प्राणी गेंडा असल्याचे बरोबर ओळखतो. यानंतर अंकिता तो पाणगेंडा असल्याचे सांगण्याचा प्रयत्न करते. पण सूरजला ते ओळखणे कठीण जाते. पुढे अंकिता पाण्यात नाचून दाखवते यावरुन सूरज तो पाण्यात पोहतो का नाचतो का असंही म्हणतो. त्यानंतर तो “गेंडा आहे हे ओळखलं आहे पण तो पाण्यातला गेंडा माहीत नाही” असं म्हणतो. यामुळे घरात एकच हशा पिकतो. सूरजने गेंडा हा प्राणी ओळखला आहे, पण तो पाण्यातला आहे हे त्याला सांगता येत नसल्याबद्दल घरातील सर्वांनाच हसायला येतं.
दरम्यान, ‘बिग बॉस’ पहिल्या फेरीत पॅडी-संग्राम यांच्या जोडीची निवड करतात. हे दोघंही २० हजार रुपये बीबी करन्सी कमावतात. तर, दुसऱ्या फेरीत वर्षा-धनंजयची जोडी ३० हजार बीबी करन्सी कमावते. ‘बिग बॉस’ तिसऱ्या फेरीत जान्हवी-अरबाज यांना काकाकुवा हा पक्षी कोणालाच माहिती नसतो. परिणामी, टाकीतलं पाणी संपून तिसरी फेरी रद्द होते. यामुळे जान्हवी-अरबाजला शून्य रुपये म्हणजेच या टास्कमध्ये काहीच करन्सी जिंकता येत नाही.