शनिवार, एप्रिल 18, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“जेव्हा तू मिस युनिव्हर्सचा खिताब…”, सुश्मिता सेनसाठी हेमांगी कवीची खास पोस्ट, म्हणाली, “तुझ्या शेजारी बसणं…”

Kshitij Lokhandeby Kshitij Lokhande
नोव्हेंबर 19, 2023 | 9:06 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Hemangi Kavi post for Sushmita Sen Birthday

"जेव्हा तू मिस युनिव्हर्सचा खिताब...", सुश्मिता सेनसाठी हेमांगी कवीची खास पोस्ट, म्हणाली, "तुझ्या शेजारी बसणं..."

मराठी कलाविश्वातील लोकप्रिय व सर्वाधिक चर्चेत राहणारी अभिनेत्री म्हणजे हेमांगी कवी. नाटक, मालिका, चित्रपट, ओटीटी या सर्वच माध्यमांमध्ये काम करत तिने प्रेक्षकांना आपलंसं केलं. त्याचबरोबर ती अनेक जाहिरातींमध्ये झळकली सुद्धा आहे. अभिनयाबरोबरच ती उत्तम नृत्यांगणा व विनोदी कलावंत देखील असून तिच्या या विविध गुणांना रसिकांकडून शाबासकीची थापसुद्धा मिळाली आहे. तसेच, ती सोशल मीडियावर बऱ्यापैकी सक्रिय असून तिच्या फोटोज व व्हिडीओजची सतत चर्चा होत असते. त्याचबरोबर विविध मुद्द्यांवरील तिचे परखड मत सर्वांचे लक्ष वेधून घेते. (Hemangi Kavi post for Sushmita Sen Birthday)

कलाविश्वातील ही बिनधास्त अभिनेत्री काही महिन्यांपूर्वी प्रदर्शित झालेल्या रवी जाधव दिग्दर्शित व सुश्मिता सेनच्या ‘ताली’ वेबसीरिजमध्ये झळकली होती. ज्यात तिने सुश्मिताच्या बहिणीची भूमिका साकारली होती. तिच्या या भूमिकेला कौतुकाचा वर्षाव झाला होता. आज अभिनेत्री सुश्मिता सेन हिचा वाढदिवस. त्यानिमित्त सोशल मीडियावर तिने एक खास पोस्ट करत सुष्मिताला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

हेमांगीने इंस्टाग्रामवर ‘ताली’च्या सेटमधील काही फोटोज शेअर केले. ज्यात ती सुश्मिताला मिठी मारताना दिसली. तसेच, अन्य फोटोमध्ये या वेबसीरिजमधील सुश्मिताबरोबरच्या एका सीनचे स्क्रीनशॉट्स शेअर केले. हे फोटोज शेअर करत ती म्हणाली, “वाढदिवसाच्या शुभेच्छा सुश्मिता. तुम्ही माझ्यासाठी एक प्रेरणा आहात. तुमच्याबरोबर काम करणं, तुमच्या शेजारी बसणं, शूटिंगदरम्यान तुमच्याबरोबर काही सुंदर आणि प्रेमळ आठवणी शेअर करणं हे माझ्यासाठी स्वप्न पूर्ण झाल्यासारखं होतं. जेव्हा तुम्ही माझा हात धरला, तो क्षण मी कधीही विसरणार नाही. जेव्हा आम्ही या सीनची तालीम करत होतो, तेव्हा मला हे अगदी खरं वाटत होतं. मी मनाने एकाच वेळी हसत होते आणि उत्सुक होते.”

हे देखील वाचा – बहिणीची पाठवणी करताना अभिषेक देशमुखने शेअर केले खास फोटो, सोशल मीडियावरील पोस्ट चर्चेत, म्हणाला, “अमृता…”

View this post on Instagram

A post shared by Hemangi Kavi-Dhumal (@hemangiikavi)

पुढे ती म्हणते, “जेव्हा तुम्ही १९९४ मध्ये मिस युनिव्हर्स सौंदर्य स्पर्धेचं खिताब पटकावला, तेव्हा ही केवळ आपल्या देशासाठी अभिमानाची गोष्ट नव्हती. तर या देशातील प्रत्येक मुलीसाठी खूप मोठी गोष्ट होती. हा प्रत्येक मुलीसाठी एक विजय होता, जो तिच्या रंग आणि उंचीमुळे समाजाकडून टोमणे मारावे लागले. ती स्वतःला कमी समजली होती. पण तुम्ही माझ्यासारख्या अनेक मुलींना आत्मविश्वास दिला, प्रोत्साहन दिलं, स्वप्नं पूर्ण करण्याचं बळ दिलं.”

हे देखील वाचा – Video : प्रसाद ओकचा लेक सार्थक झाला पदवीधर, अभिनेत्याने शेअर केला व्हिडीओ, म्हणाला, “सगळ्यांपासून लांब राहून…”

“एक सावळ्या रंगाची, मध्यमवर्गीय घरातून आलेली सामान्य मुलगी खऱ्या अर्थाने असामान्य विजय मिळवू शकते. तुमच्या या विजयाने, विचारांनी आणि शब्दांनी अनेक पिढयांना प्रेरित केलं. त्यांना स्वतःच्या अटींवर जगू शकतात आणि आनंदी राहू शकतात, हे तुम्ही दाखवून दिलं. तुम्ही खूप सुंदर आहात.”, असं म्हणत तिने वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. तिची ही पोस्ट सध्या व्हायरल होत आहे.

Tags: hemangi kaviHemangi Kavi post for Sushmita Sen Birthdayinstagram postsushmita sentaali web series
Kshitij Lokhande

Kshitij Lokhande

Latest Post

Siddharth Venugopal actor death news
Entertainment

सुप्रसिद्ध साऊथ अभिनेत्याचे कॅन्सरने निधन, वयाच्या ४१व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, सिनेसृष्टीला धक्का

एप्रिल 18, 2026 | 1:28 pm
Akshaya Tritiya 2026
Lifestyle

अक्षय तृतीया 2026 च्या लक्ष्मीपूजनासाठी घराची तयारी कशी कराल?, दरवाजे, खिडक्या, आरसे…

एप्रिल 18, 2026 | 12:16 pm
how sleep can impact heart health
Lifestyle

झोपेच्या कमतरतेमुळे डायबिटीस, हृदयविकार, लठ्ठपणा, मानसिक समस्यांचा धोका वाढतो, जाणून घ्या यावर उपाय…

एप्रिल 18, 2026 | 11:50 am
Kadambari Mali Interview
Entertainment

“१६ वर्षाचीच मुलगी Lead हवी”, लीडच्या भूमिका न मिळण्यावर मराठी अभिनेत्रीच भाष्य, म्हणाली, “फुकट काम…”

एप्रिल 18, 2026 | 11:00 am
Next Post
anushka sharma hug virat kohli after team india lost

भारताच्या पराभवानंतर विराट कोहलीची झाली अशी अवस्था, अनुष्काने स्टेडियममध्येच मिठी मारली अन्…

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.