हिंदी सिनेसृष्टीतील ड्रीम गर्ल हेमा मालिनी यांनी स्वतःला चित्रपटांपासून दूर केलं असल्याचं पाहायला मिळत आहे. त्यानंतर त्या दीर्घकाळ राजकारणात सक्रिय आहेत. हेमा मालिनी त्यांच्या व्यावसायिक आयुष्यापेक्षा वैयक्तिक आयुष्यामुळे अधिक चर्चेत असतात. अशातच अभिनेत्रीने नुकतीच राम मंदिराला भेट दिली. अयोध्येला पोहोचताच त्यांनी श्री रामजन्मभूमी मंदिरात जाऊन रामलल्लाचे दर्शन घेतले. यावेळी अभिनेत्रीने ‘राग सेवा’ही सादर केलेली पाहायला मिळाली. (Hema Malini On Ram Mandir)
शनिवारी सकाळी अभिनेत्रीने तिच्या ट्विटर अकाऊंटवरुन मंदिराची छायाचित्रे शेअर करायची. यावेळी अभिनेत्रीने ‘रामलल्ला दिव्य दर्शनाचा आनंद घेतला” असं म्हणत तिने ही पोस्ट शेअर केली. मंदिरात ‘राग सेवा’ करणार असल्याचेही अभिनेत्रीने उघड केले. हेमा यांनी पोस्ट शेअर करत लिहिले की, “सध्या अयोध्येत कुटुंबासह राम लल्लाच्या दिव्य दर्शनाचा आनंद घेत आहे. खरोखरच धन्य वाटत आहे, कारण मी राम लल्लासाठी मंदिरात राग सेवा सादर करणार आहे. अनेक मान्यवर कलाकारांनी याआधीही येथे सादरीकरण केले आहे. हे सादरीकरण एक दैवी आवाहन आहे.”
In Ayodhya now with family and enjoying the divine darshan of Ram Lalla. Feel truly blessed esp as I will be doing my Raag Seva in the mandir for Ram Lalla. Many eminent artistes have already performed here and many more are lined up. It is a divine bulaava???? pic.twitter.com/sbEf90u31P
— Hema Malini (@dreamgirlhema) February 17, 2024
मंदिराच्या भव्य उद्घाटन समारंभाचा एक भाग म्हणून, राग सेवा नावाचा ४५ दिवसांचा संगीत कार्यक्रम २७ जानेवारीपासून मंदिरात सुरु झाला. या कार्यक्रमात भारतातील विविध प्रांतातील व परंपरेतील १०० हून अधिक नामवंत कलाकार आपली राग सेवा सादर करणार आहेत. गुढी मंडप येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात वैजयंती माला, सुरेश वाडकर, अनुप जलोटा, जसबीर जस्सी, अश्विनी भिडे-देशपांडे, राहुल देशपांडे व इतर कलाकारांचा समावेश आहे.
शुक्रवारी मंदिरात प्रार्थना केल्यानंतर हेमा मालिनी माध्यमांना म्हणाल्या, “आम्ही चांगले दर्शन घेतले. येथील सर्व व्यवस्था उत्तम आहे. मंदिरामुळे अनेकांना रोजगार मिळत आहे.”