रविवार, जुलै 26, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“भरकटलेल्या मुलींचा सांभाळ…”, बालिकाश्रमाला भेट दिल्यानंतर प्राजक्ता माळीचं लोकांना आवाहन, होत आहे कौतुक, म्हणाली, “मदत करा कारण…”

Saurabh Moreby Saurabh More
फेब्रुवारी 17, 2024 | 11:43 am
in Entertainment
Reading Time: 2 mins read
google-news
Marathi Actress Prajakta Mali shared special post on social media the occasion of her visit to girls orphanage in Virar

"भरकटलेल्या मुलींचा सांभाळ...", बालिकाश्रमाला भेट दिल्यानंतर प्राजक्ता माळीचं लोकांना आवाहन, होत आहे कौतुक, म्हणाली, "मदत करा कारण..."

सध्या सोशल मीडिया हे जितके मनोरंजनाचे साधन म्हणून वापरले जाते, तितकेच ते समाजप्रबोधनाचे कामही करते. सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक कलाकार मंडळी समाजातील महत्त्वाच्या विषयांवर भाष्य करत असतात. मराठी मनोरंजन विश्वातील अनेक कलाकार आहेत, जे सामाजिक, राजकीय परिस्थितीवर अगदी खुलेपणाने भाष्य करतात. अशा काही कलाकारांपैकी एक अभिनेत्री म्हणजे प्राजक्ता माळी.

अभिनेत्री प्राजक्ता माळी ही नेहमीच सामाजिक, कला, राजकीय अशा विविध विषयांवर व्यक्त होत असते. अशातच तिने सोशल मीडियावर नुकत्याच केलेल्या एका पोस्टने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. प्राजक्ताने नुकतीच विरारमधील एका बालिकाश्रमाला भेट दिली असून अनाथ मुलींची सध्याची परिस्थिती व त्या मुलींचा सांभाळ याबाबत अभिनेत्रीने खास पोस्ट शेअर केली आहे. 

View this post on Instagram

A post shared by Prajaktta Mali (@prajakta_official)

प्राजक्ताने तिच्या इन्स्टाग्रामद्वारे एक खास व्हिडीओ शेअर केला आहे आणि हा व्हिडीओ शेअर करत तिने असं म्हटलं आहे की, “२ दिवसांपूर्वी नेटफ्लिक्सवर ‘भक्षक’ चित्रपट बघत होते आणि त्याच संध्याकाळी या बालिकाश्रमाला भेट देण्याचा योग आला. कधी कधी आपल्या शेजारच्या बिल्डींगमध्ये, चौकातील रस्त्यांवरील झोपड्यांमध्ये, आपल्या अवतीभवती काय चालू असतं याची आपल्याला अजिबात कल्पना नसते. अशाच काही भरकटलेल्या ठिकाणांहून या मुली इथे आल्यात आणि त्यांचा इथे चांगला सांभाळ होत आहे हे बघून बरं वाटलं.”

आणखी वाचा – ना परदेश, ना पर्यटन स्थळ; शशांक केतकर फिरण्यासाठी बायकोसह पोहोचला ठाण्यातील ‘या’ ठिकाणी, म्हणाला, “‘होणार सून…”

यापुढे प्राजक्ताने या पोस्टमध्ये असं म्हटलं आहे की, “तुमच्याही अवतीभवती अशा मुली असतील तर त्यांच्या मदतीसाठी पुढे या. विरारमधील या बालिकाश्रमाचा पर्याय तर खूलाच आहे.” यापुढे तिने या बालिकाश्रमाची सविस्तर माहिती देत “’भक्षक’ हा चित्रपट जरुर पाहा, म्हणजे मला नेमकं काय म्हणायचं आहे हे तुमच्या ध्यानात येईल. हा चित्रपट म्हणून अगदी उत्तम झाला आहे” असंही म्हटलं आहे.

आणखी वाचा – मन धागा धागा जोडते नवा! पूजा सावंत व सिद्धेश चव्हाण यांचा साखरपुडा सोहळा संपन्न, कलाकारांची गर्दी अन्…

दरम्यान, भूमी पेडणेकरची मुख्य भूमिका असलेला ‘भक्षक’ हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला असून या चित्रपटाचे कथानक हे आश्रमात लहान मुलींवर होत असलेल्या अत्याचारावर आधारित असून मुख्य नायिका या मुलींची कशी सुटका करते? हे आहे.

Tags: मनोरंजन बातमीमराठी अभिनेत्रीमराठी मनोरंजनमराठी बातमीप्राजक्ता माळीentertainment newsmarathi actressmarathi entertainmentmarathi entertainment newsMarathi newsprajakta mali
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Pach Futacha Bachchan Marathi Movie
Entertainment

‘पाच फुटाचा बच्चन’ चा दैदीप्यमान प्रवास : कीर्तन, संस्कृती आणि संघर्षाची प्रेरणादायी कथा

जुलै 25, 2026 | 2:00 pm
Shekhar Suman On Student Protest
Entertainment

तीन दिवस झोप नाही, रडत आहे आणि…; आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचार्जमुळे प्रसिद्ध अभिनेत्याला दुःख, म्हणाला…

जुलै 25, 2026 | 12:45 pm
Eva grover husband hyder ali khan
Entertainment

दिग्दर्शकासह शरीरसंबंध ठेवण्यास जबरदस्ती आणि…; नवऱ्याबाबत सुप्रसिद्ध अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा, म्हणाली, “पैशांसाठी…”

जुलै 25, 2026 | 11:00 am
Akanksha Chamola Gaurav Khanna Lock Upp 2
Entertainment

Lock Upp 2 : गौरव खन्नाची कुत्र्याशी तुलना करणं पत्नीला पडलं भारी, नेटकरी भडकले, म्हणाले, “घटस्फोट दे…”

जुलै 25, 2026 | 9:50 am
Next Post
Prasad Oak Birthday

"फोटोत तोंड बंद आहे म्हणून…", बायकोनेच केली प्रसाद ओकची पोलखोल, फोटो पोस्ट करत म्हणाली, "तुला पर्याय नाही कारण…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.